ETV Bharat / city

Nawab Malik Will Not Resign : राष्ट्रवादीचा मोठा निर्णय.. मलिकांचा राजीनामा नाहीच.. मात्र, दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलणार - परभणीच्या पालकमंत्री पदी धनंजय मुंडे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीचे मंत्री व महत्वाच्या नेत्यांची बैठक पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पार ( NCP Important Meet By Sharad Pawar ) पडली. त्यात न्यायालयीन कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात येणार नसल्याचे निश्चित करण्यात ( Nawab Malik Will Not Resign ) आले. मात्र मलिक यांच्याकडे असलेल्या पालकमंत्री पदाचा पदभार दुसऱ्या मंत्र्यांना देण्यात येणार आहे.

शरद पवार
शरद पवार
author img

By

Published : Mar 17, 2022, 10:48 PM IST

मुंबई : शरद पवार यांच्या निवासस्थानी बोलावलेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक संपली ( NCP Important Meet By Sharad Pawar ) आहे. नवाब मलिक यांच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार दुसऱ्यांकडे देण्याबाबत बैठकीत चर्चा ( Nawab Malik Will Not Resign ) झाली. धनंजय मुंडे आणि प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवावा असा निर्णय झाला. परभणीच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार धनंजय मुंडे तर गोंदियाच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार प्राजक्त तनपुरेंकडे द्यावा, असे बैठकीत ठरवण्यात आले. मंत्री जयंत पाटील यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.

प्रमुख नेते बैठकीत सहभागी

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल ( Five State Election Result 2022 ) तसेच राज्यात होत असलेल्या महत्वाच्या घडामोडींसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महत्वाची बैठक बोलावली ( Sharad Pawar Called Important Meet ) होती. मुंबईतील शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे सायंकाळी सात वाजता ही बैठक सुरु झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) , जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदींसह राष्ट्रवादीचे मंत्री व प्रमुख नेते उपस्थित होते.

बैठकीत झाली महत्वाची चर्चा

पाच राज्यांच्या निकालात भाजपला चार राज्यात बहुमत मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर पक्षाच्या भूमिकेत काही बदल राष्ट्रवादीकडून करण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते. यासह राज्यात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह विद्यमान मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी टाकण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

गृहमंत्री, शरद पवारांची गुप्त बैठक

या बैठकीच्या आधी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ( Yashwantrao Chavhan Pratishthan Mumbai ) येथे शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची गुप्त बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या बैठकीत मंत्री मलिक यांच्याकडील पालकमंत्री पद इतर मंत्र्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.