ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे 973 नवे रुग्ण; 24 रुग्णांचा मृत्यू, रुग्ण दुप्पटीचा कालावधी 515 दिवसांवर

author img

By

Published : Jun 4, 2021, 8:09 PM IST

मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली होती. सोमवारी 676 रुग्ण आढळून आले होते. आज त्यात वाढ होऊन 973 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

mumbai corona
mumbai corona

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली होती. सोमवारी 676 रुग्ण आढळून आले होते. आज त्यात वाढ होऊन 973 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज 24 रुग्णांचा मृत्यू झाला तर 1207 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी 515 दिवसांवर पोहचला आहे.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 515 दिवस, मुंबईत आज 973 रुग्ण -

मुंबईत आज 973 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 9 हजार 941 वर पोहचला आहे. आज 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 989 वर पोहचला आहे. 1207 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 76 हजार 400 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 16 हजार 347 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 515 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 31 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 126 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 27 हजार 351 तर आतापर्यंत एकूण 63 लाख 71 हजार 996 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच -
1 मे ला 3908, 2 मे ला 3672, 3 मे ला 2662, 4 मे ला 2554, 5 मे ला 3879, 6 मे ला 3056, 7 मे ला 3039, 8 मे ला 2678, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 11 मे ला 1717, 12 मे ला 2116, 13 मे ला 1946, 14 मे ला 1657, 15 मे ला 1447, 16 मे ला 1544, 17 मे ला 1240, 18 मे ला 953, 19 मे ला 1350, 20 मे ला 1425, 21 मे ला 1416, 22 मे ला 1299, 23 मे ला 1431, 24 मे ला 1057, 25 मे ला 1037, 26 मे ला 1362, 27 मे ला 1266, 28 मे ला 929, 29 मे ला 1048, 30 मे ला 1066, 31 मे ला 676, 1 जून ला 831, 2 जूनला 925, 3 जून ला 961, 4 जून ला 973 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.