ETV Bharat / city

BMC School SSC Results : मुंबई महापालिका शाळांच्या निकालाची टक्केवारी वाढली - दा दहावीचा निकाल ९७ टक्के

राज्याचा यंदा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. तर याच परीक्षेत मुंबई महापालिकेच्या शाळांचा निकाल ( Results of Mumbai Municipal Corporation 10th School ) ९७.१० टक्के लागला आहे. २०२० च्या तुलनेत पालिका शाळांचा निकाल ३.८५ टक्क्यांनी वाढला आहे.

bmc school
bmc school
author img

By

Published : Jun 17, 2022, 5:10 PM IST

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत राज्याचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. तर याच परीक्षेत मुंबई महापालिकेच्या शाळांचा निकाल ( Results of Mumbai Municipal Corporation 10th School ) ९७.१० टक्के लागला आहे. २०२० च्या तुलनेत पालिका शाळांचा निकाल ३.८५ टक्क्यांनी वाढला आहे.

पालिका शाळांचा ९७.१० टक्के निकाल : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुदानित व विनाअनुदानित अशा एकूण २४३ माध्यमिक शाळांमधून मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेकरिता बसलेल्या १६ हजार ८०७ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ३१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा महापालिका शाळांचा दहावीचा निकाल ९७.१० टक्के लागला आहे. मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोना विषाणूने शिरकाव केल्याने गेले दोन वर्षे शाळा बंद होत्या. त्यानंतर यावर्षी शाळा सुरु झाल्या आहेत.

२०२० मध्ये निकालात झाली होती विक्रमी वाढ : २०१६ मध्ये दहावीचा निकाल ७६.९७ टक्के लागला होता. २०१७ मध्ये ८.६ टक्क्यांनी घाट होऊन ६८.९१ पर्यंत निकाल खालावला होता. २०१८ मध्ये ५ टक्क्यांची वाढ होऊन ७३.८१ टक्के निकाल लागला होता. २०१९ मध्ये अंतर्गत गुण रद्द केल्यामुळे निकालात २०.६६ टक्क्यांनी घट होऊन ५३.१५ टक्के निकाल लागला. २०२० मध्ये ४०.१० टक्क्यांची विक्रमी वाढ होऊन ९३.२५ टक्के लागला होता.

हेही वाचा - SSC Exam 2022 Result : दहावीचा निकाल असा पाहा ऑनलाईन, यंदाही विद्यार्थिनी विद्यार्थ्यांच्या तुलनेत मारणार का बाजी?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.