मुंबई - राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाचा बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना देखील लागण झाली आहे. आतापर्यंत राज्यातील 96 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह झाले असून यामध्ये 15 अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. तसेच उर्वरित 81 पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित असून आतापर्यंत 7 कर्मचाऱ्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय.
22 मार्च ते 25 एप्रिल या काळात 69 हजार 374 गुन्हे दाखल झाले असून, क्वारंटाईनचे नियम मोडणाऱ्या 602 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ला होण्याच्या 148 घटना घडल्या असून या प्रकरणी 477 जणांना अटक करण्यात आली आहे.
राज्यभरात लॉकडाऊनच्या कालावधीत पोलीस विभागाच्या 100 या नियंत्रण क्रमांकावर आता पर्यंत 77 हजार 670 फोन आले आहेत. अवैद्य वाहतूकी संदर्भात 1084 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच 14 हजार 55 जणांना अटक करून तब्बल 47 हजार 168 वाहने जप्त करण्यात आली आहेत.