ETV Bharat / city

Iqbal Singh Chahal On Mumbai Corona : एकही डोस न घेतलेले रुग्ण ऑक्सिजन बेडवर - आयुक्त चहल - मुंबई कोरोना बातम्या

मुंबईत सक्रिय रुग्णांनी 90 हजारांचा टप्पा पार केला ( Mumbai Active Cases ) आहे. त्यामधील दोन हजार रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. यातील 96 टक्के रुग्णांनी एकही कोरोनाचा डोस घेतला नसल्याची माहिती पालिका आयुक्त चहल ( Mumbai Commissioner Iqbal Chahal ) यांनी दिली.

Iqbal Singh Chahal
आयुक्त चहल
author img

By

Published : Jan 8, 2022, 6:43 PM IST

मुंबई - मुंबईत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली ( Mumbai Corona Cases Increased ) आहे. गेल्या दोन दिवसांपासून 20 हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 91,731 वर गेली. यातील दोन हजार रुग्ण ऑक्सिजन बेडवर असून, त्यातील 96 टक्के रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नसल्याची धक्कादायक माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल ( Iqbal Singh Chahal On Corona Vaccine ) यांनी दिली.

देशात महाराष्ट्र कोरोना रुग्णसंख्येत आघाडीवर आहे. मात्र, कोरोना प्रतिबंध लसीमुळे सध्या सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची नोंद होत आहे. जे रुग्ण दाखल होत आहे आणि ज्यांना ऑक्सिजन बेडची गरज भासते आहे, अशा 96 टक्के रुग्णांनी एकही डोस घेतला नाही. तसेच, लस घेतलेल्या नागरिकांना याचा निश्चित फायदा झाला असल्याचा दावा आयुक्त इक्बाल चहल यांनी केला.

लॉकडाऊनची गरज नाही -

पुढे बोलताना चहल म्हणाले की, मुंबईत सापडणाऱ्या रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण सौम्य लक्षणे असलेले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. प्राथमिक उपचार करुन अथवा दोन दिवसानंतर रुग्णांना सोडले जाते. मुंबईत रुग्ण वाढत असले तरी ऑक्सिजन आणि अतिदक्षता विभागातील रुग्णांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे सध्यातरी लॉकडाऊन करण्याची ( Iqbal Singh Chahal On Mumbai Lockdown ) आवश्यकता नाही.

महापालिकेकडे पुरेसा ऑक्सिजन साठा -

महापालिकेतर्फे 1 कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही आणि 90 लाख नागरिकांना लसीचा एक डोस देण्यात आला आहे, गेल्या 16 दिवसांत केवळ 19 रुग्ण दगावले आहे. त्यामुळे मृत्यू दर नियंत्रित करण्यात यश आले आहे. मुंबईत आजमितीला एक लाख सक्रिय रुग्ण असले तरी केवळ दहा टन ऑक्सीजन वापरला जातो आहे. दुसऱ्याला लाटेत महापालिकेतर्फे काहीही ऑक्‍सिजन निर्मिती होत नव्हती. पण, यावेळेस महापालिकेतर्फे २०० टन ऑक्सिजन निर्मिती करण्यात येत असून, आमच्याकडे ४०० टन ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणतीही चिंतेची बाब नसल्याचा ( Iqbal Singh Chahal On Oxygen ) दावा चहल यांनी केला.

हेही वाचा - Mumbai Mayor On Corona : मुंबई डेंजर झोनच्या बाहेर, मात्र काळजी घ्या - किशोरी पेडणेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.