मुंबई - मुंबईच्या रस्तांवरती पुन्हा एकदा डबल डेकर बेस्ट बसेस धावताना दिसणार ( Mumbai Best Double Decker Buses ) आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली ( Aditya Thackeray Announced Double Decker Bus )आहे. मुंबईसाठी 900 इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस 12 वर्षासाठी वेट लीजवर खरेदी करायला बेस्टने मंजूरी दिली ( Best 900 Double Decker Buses Buy ) आहे. यासाठी 3600 कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात ट्विट करत आदित्य ठाकरे म्हणाले ( Aditya Thackeray Tweet ) की, "डबल डेकर बस यापुढे इलेक्ट्रिक असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी मुंबईच्या प्रतिष्ठित डबल डेकर बसचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उत्सुक आहे. तसेच, आम्ही जास्तीत जास्त डबल डेकर बसेस आणणार आहोत."
-
The BEST double-decker, now electric!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
CM Uddhav Thackeray and I have been personally keen on reviving Mumbai’s iconic double-decker buses. pic.twitter.com/lQkjvKlVgh
">The BEST double-decker, now electric!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 27, 2022
CM Uddhav Thackeray and I have been personally keen on reviving Mumbai’s iconic double-decker buses. pic.twitter.com/lQkjvKlVghThe BEST double-decker, now electric!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 27, 2022
CM Uddhav Thackeray and I have been personally keen on reviving Mumbai’s iconic double-decker buses. pic.twitter.com/lQkjvKlVgh
"बेस्टच्या ताफ्यात 10000इलेक्ट्रिक/क्लीन पर्यायी इंधन बसेस वाढवताना, अधिकाधिक डबल डेकर बसेस समाविष्ट करण्याचे आमचे ध्येय," असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आदित्य ठाकरे यांनी बेस्टचे अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक यांचे आभार मानले आहेत. "आमच्या मागणीचा आदर केल्याबद्दल मी बेस्टचे अध्यक्ष आशिष चेंबुरकर, महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आणि बेस्ट समितीचे आभार मानतो."
हेही वाचा - भाजपचा टिपू सुलतान बाबतचा विरोध खोटेपणावर आधारित -मलिक