मुंबई - राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसांत 1 हजारांहून कमी रुग्ण आढळून येत आहेत. आज बुधवारी 893 नव्या रुग्णांची नोंद झाली. आज 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 40 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.72 टक्के, तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.
6,286 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 893 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 40 हजार 888 वर पोहोचला आहे. तर, आज 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 41 हजार 204 वर पोहोचला आहे. आज 1 हजार 40 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 89 हजार 720 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.72 टक्के, तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 63 लाख 88 हजार 902 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 74 हजार 170 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून 6 हजार 286 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 260
ठाणे पालिका - 39
नवी मुंबई पालिका - 38
कल्याण डोंबिवली पालिका - 22
नाशिक पालिका - 31
अहमदनगर - 39
पुणे - 76
पुणे पालिका - 107
पिंपरी चिंचवड पालिका - 48
या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
25 ऑक्टोबरला घट होऊन 889, 1 नोव्हेंबरला 809, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982,
11 नोव्हेंबरला 997, 22 नोव्हेंबरला 656, 23 नोव्हेंबरला 766, 25 नोव्हेंबरला 848, 26 नोव्हेंबरला 852, 28 नोव्हेंबरला 832, 29 नोव्हेंबरला 536, 30 नोव्हेंबरला 678, 1 डिसेंबरला 767, 2 डिसेंबरला 796, 3 डिसेंबरला 664, 4 डिसेंबरला 782, 5 डिसेंबरला 707, 6 डिसेंबरला 518, 7 डिसेंबरला 699 असे सर्वात कमी नवे रुग्ण आढळून आले आहेत.