ETV Bharat / city

दोन दिवसांच्या टाळेबंदीमुळे महाराष्ट्राचे ८ ते १० हजार कोटींचे नुकसान

शनिवार आणि रविवार हे दोन दिवस व्यापार्‍यांच्या दृष्टीने आणि बाजारपेठेतील उलाढालीसाठी अतिशय मोक्याचे दिवस मानले जातात, परंतु याच दोन दिवशी टाळेबंदी लागल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.

author img

By

Published : Apr 15, 2021, 8:18 PM IST

मुंबई
मुंबई

मुंबई - राज्यासह देशभरामध्ये कोरोना रुग्णांचा संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आणि त्यातही मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी परिस्थिती पाहता विकेंड टाळेबंदी लागू करण्यात आली होती. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस व्यापार्‍यांच्या दृष्टीने आणि बाजारपेठेतील उलाढालीसाठी अतिशय मोक्याचे दिवस मानले जातात, परंतु याच दोन दिवशी टाळेबंदी लागल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

मुंबई

मागील आठवड्याच्या अंतिम दोन दिवशी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी लावण्यात आलेल्या दोन दिवसांच्या वीकेंड टाळेबंदीमुळे एकट्या महाराष्ट्राचे ८ ते १० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) ही आकडेवारी जाहीर केली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लॉकडाउनसदृश्य स्थिती झाली आहे. यामुळे मागील आठवड्यात बाजार कमी-अधिक प्रमाणातच सुरू होता. शनिवार व रविवारी कडक टाळेबंदी व संचारबंदी होती. या सर्वांमध्ये सर्वाधिक रोजगार असलेल्या किरकोळ व्यापार क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे 'कॅट'चे म्हणणे आहे.

तज्ज्ञांच्या मते, मागील वर्षीच्या करोना संकटात संपूर्ण व्यापार क्षेत्र जवळपास आठ महिने ठप्प होते. त्यात या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा राज्यात आठवडाअखेरीस टाळेबंदी लावल्याचा सर्वाधिक फटका आर्थिक राजधानी मुंबईला बसला आहे. ६० टक्के किरकोळ व्यापारी व त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी भीषण आर्थिक संकटात आहेत. प्रामुख्याने आंतरराज्य व आंतरजिल्हा वाहतुकीत मोठे अडथळे येत आहेत. या आकडेवारीनुसार, संपूर्ण देशात सध्या विविध ठिकाणी टाळेबंदीसारखी स्थिती आहे. त्यामुळे घाऊक व्यापार क्षेत्राचे ३२ हजार कोटी, तर किरकोळ व्यापार क्षेत्राचे १२ ते १४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. महाराष्ट्रात टाळेबंदीची तीव्रता सर्वाधिक आहे. त्यामुळे येथील किरकोळ क्षेत्राचे सुमारे चार कोटी व घाऊक क्षेत्राचे सहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.