ETV Bharat / city

Har Ghar Triranga: मुंबईत ८ लाखाहून अधिक तिरंग्यांचे वाटप; 50 लाख ध्वजवाटपाचे उद्देश्य - Distribution of Tricolor by BMC

हर घर तिरंगा अभियानांर्तगत मुंबईतील सर्व निवासस्थानांवरती राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी महापालिकेकडून घराघरात, दुकानात, कार्यालयाच्या इमारती येथे तिरंगा झेंडा वाटप ( Tiranga distribution by BMC ) सुरू झाले आहे. आतापर्यंत ८ लाखांहून अधिक झेंड्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती बृह्न्मुंबई पालिका प्रशासनाकडून ( Distribution of Tricolor by BMC ) देण्यात आली आहे.

Tiranga distribution by BMC
बृह्न्मुंबई पालिका प्रशासनाकडून तिरंगा वाटप
author img

By

Published : Aug 6, 2022, 6:26 PM IST

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी ( Amrit Mahotsav of Indian Independence ) वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मुंबईत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत 'हर घर तिरंगा' अभियान ( Har Ghar Triranga campaign in Mumbai ) राबवले जाणार आहे. या अभियानात मुंबईतील सर्व निवासस्थानांवरती राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी महापालिकेकडून घराघरात, दुकानात, कार्यालयाच्या इमारती येथे तिरंगा झेंडा वाटप ( Tiranga distribution by BMC ) सुरू झाले आहे. आतापर्यंत ८ लाखांहून अधिक झेंड्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती बृह्मुंबई पालिका प्रशासनाकडून ( Distribution of Tricolor by BMC ) देण्यात आली आहे.

८ लाखांहून अधिक राष्ट्रध्वजाचे वितरण -
भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवा निमित्त मुंबई महापालिका प्रशासनानेही १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत असून या अभियाना अंतर्गत ३५ लाख निवासस्थाने व विविध अस्थापने या ठिकाणी ५० लाख मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात येणार आहे. आतापर्यंत ८ लाखांहून अधिक राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले आहे. तर मुंबई महापालिकेला १० लाख राष्ट्रध्वज प्राप्त झाले असून उर्वरित राष्ट्रध्वजाचा साठा तीन ते चार दिवस उपलब्ध होईल, अशी माहिती पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली.

चित्रिकरण करा, देखरेख पथक - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे, ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी राष्ट्रध्वज खरेदी करून घरोघरी पोहोचवण्याचे मोठे लक्ष्य महानगरपालिकेने समोर ठेवले आहे. राष्ट्रध्वज खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता सर्व २४ विभाग कार्यालयांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील निश्चित घरांच्या संख्येनुसार राष्ट्रध्वज तिरंगा पुरवठा टप्प्याटप्प्याने केला जात आहे. सर्व विभाग कार्यालयांनी राष्ट्रध्वज साठा प्राप्त झाल्यानंतर दररोज त्याचे योग्य रीतीने आणि जलद कार्यवाही होईल, अशा रीतीने वितरण करावे. घरोघरी राष्ट्रध्वज पोहोचवताना चित्रीकरण करावे. तसेच वितरण कार्यपद्धती सुरू आहे किंवा कसे, याची खातरजमा करण्यासाठी देखरेख पथक देखील नेमावे. घरोघरी तिरंगा अभियान कालावधीत सर्व नागरिकांनी राष्ट्रध्वज संहितेप्रमाणे तिरंगा झेंडा फडकवावा. अभियान कालावधी संपल्यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची आठवण म्हणून हा तिरंगा झेंडा सर्व नागरिकांनी जपून ठेवावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

'लेझर शो'चे आयोजन - भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवा निमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान एअर इंडिया बिल्डिंग, हॉटेल ट्रायडंट, एनसीपीए इमारत, मरिन ड्राईव्ह, चर्चगेट, दक्षिण मुंबईतील हेरिटेज इमारती या ठिकाणी "लेझर शो" चे आयोजन करण्यात येणार आहे. या इमारतींवर तिरंगी फसाडे लायटिंग करण्यात येणार आहे.

अशी केली जातेय जनजागृती - 'हर घर तिरंगा' उपक्रमाच्या जनजागृतीसाठी मुंबईमध्ये ६०० ठिकाणी होर्डिंग लावण्यात आले आहेत. उद्याने, बसस्टॉप, बस डेपो, रेल्वे स्टेशन, मार्केट, महापालिका कार्यालये आदी गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करणारे फलक लावण्यात आले आहेत. लोकांची गर्दी असणाऱ्या मार्केट, रेल्वे स्थानक, शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी पथनाट्य करून जनजागृती केली जात आहे. व्यापारी, मार्केट संघटना यांच्याशी बैठका घेऊन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.

महापालिका कार्यालय इमारतीवर तिरंगी रोषणाई - हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पालिका कार्यालयाच्या इमारतीवर तिरंगा रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीवर २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दिवशी तिरंगी रोषणाई केली जाते. आता हर घर तिरंगा मोहिमेसाठी पालिकेच्या विभाग कार्यालयाच्या इमारतींवर तिरंगी रोषणाई करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा- Bhandara Rape Case : भंडारा सामूहिक अत्याचाराचा तपास फास्ट ट्रॅकवर; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.