ETV Bharat / city

Navi Mumbai: शिवडी-न्हावा शेवा सागरी पुलाचे ७५ टक्के काम पूर्ण; भारतातील सर्वात मोठा महत्वकांक्षी प्रकल्प

मुंबई व नवी मुंबईतीला ( Mumbai and Navi Mumbai ) हाकेच्या अंतर जोडण्यासाठी शासनाच्या माध्यमातून शिवडी ते न्हावा शेवा सागरी पुलाचे काम ( Shivdi to Nhava Sheva Sea Bridge work ) सुरू केले आहे. तर सागरी मार्गाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण होईल असे शासनाने सांगितले आहे. तर पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा भारतातील सर्वात मोठा पुल असणार आहे.

75 Percent work Of Shivdi Nava Sheva Sea Bridge
शिवडी-न्हावा शेवा सागरी पुलाचे ७५ टक्के काम पूर्ण
author img

By

Published : Jul 21, 2022, 5:25 PM IST

नवी मुंबई : मुंबई व नवी मुंबईतीला ( Mumbai and Navi Mumbai ) हाकेच्या अंतरावर जोडण्यासाठी शासनाच्या माध्यमातून शिवडी ते न्हावा शेवा सागरी पुलाचे काम सुरू ( Shivdi to Nhava Sheva Sea Bridge work ) केले आहे. सध्या या कामाने गती घेतली आहे. या मार्गावर आर्थोट्रोपिक स्टील डेकचे गाळे बसविण्याचे काम सुरू आहे . या मार्गावर एकूण ३२ गाळे बसविण्यात येत असून या गाळ्यांची निर्मिती जपान, दक्षिण कोरिया, तैवान, व्हिएतनाम व म्यानमारमध्ये करण्यात आली आहे. सागरी मार्गाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण होईल असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

२२ किलोमीटर लांबीच्या पुलाद्वारे जोडली जाणार दक्षिण मुंबई नवी मुंबई व पुणे - शिवडी-न्हावा शेवा पारबंदर मार्ग हा मुंबई महानगर क्षेत्रामधील एक प्रस्तावित प्रकल्प आहे. अरबी समुद्राच्या ठाणे खाडीवर २२ किमी लांबीच्या व भारतातील सर्वात मोठ्या पूलाद्वारे दक्षिण मुंबईमधील शिवडी भाग नवी मुंबईसोबत जोडला जाणारं आहे. हा मार्ग मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गासोबत देखील जोडला जाणार आहे. ज्यामुळे पुण्याहून दक्षिण मुंबईकडे वाहतूक देखील सुलभ होणार आहे . तसेच प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील दक्षिण मुंबईहून कमी अंतरात गाठता येणार आहे.

१७८८३ कोटी रुपये खर्च करून २२ किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग- १७८८३ कोटी रुपये खर्च करून २२ किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग तयार केला जात आहे. या मार्गावर ७.८१ किलोमीटर लांबीच्या पुलावर ऑर्थोट्रोपिक स्टील डेक बसविण्यात येत आहेत. डेकचे एकूण ३२ गाळे बसविण्यात येत आहे गाळ्याची लांबी ७० मीटर असून रुंदी १४.९२ किलोमीटर आहे. प्रकल्पातील पॅकेज १ व पॅकेज २ ओएसडी गाळ्यांसाठी ८७,४५२ टन पोलाद वापरण्यात आले आहे. या स्टील गाळ्यांचे काम पाच देशांतील फॅब्रिकेशन कारखान्यात केले जात आहे. या पाच देशातून उरण परिसरातील करंजा येथील जोडणी यार्डमध्ये आणले जात असून करंजा येथे जोडणी केली जात आहे. ऑर्थोट्रोपिक स्टील डेकची वाहतूक करण्यासाठी ॲक्वा फ्लोट बार्ज ३३० चा वापर केला जात असून, या बार्जची लांबी १००.५८ मीटर व रुंदी ३६ मीटर आहे.

हेही वाचा : Costal Raod Mumbai : कोस्टल रोडच्या कामाला गती; ५८ टक्के काम पूर्ण, लवकरच कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.