ETV Bharat / city

#LockdownEffect: ७३ लाख वीजग्राहकांकडून 'ऑनलाईन' भरणा - mumbai power supply

लॉकडाऊमुळे महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील ७३ लाख २९ हजार वीजग्राहकांनी मागील महिन्यात घरबसल्या १२२७ कोटी २५ लाख रुपयांचे ऑनलाईन वीजबिल भरले आहे.

mscb
#LockdownEffect: ७३ लाख वीजग्राहकांकडून 'ऑनलाईन' भरणा
author img

By

Published : Apr 6, 2020, 10:34 PM IST

मुंबई - लॉकडाऊमुळे महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील ७३ लाख २९ हजार वीजग्राहकांनी मागील महिन्यात घरबसल्या १२२७ कोटी २५ लाख रुपयांचे ऑनलाईन वीजबिल भरले आहे. यामध्ये सर्वाधिक पुणे परिमंडळातील १३ लाख ५० हजार तसेच भांडूप परिमंडळातील 11 लाख वीजग्राहकांचा समावेश आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र देखील बंद आहेत. मात्र वीजग्राहकांनी महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर ऑनलाईन पर्याय उपलब्ध केले होते.
मार्च महिन्यात ७३ लाख २९ हजार ग्राहकांनी घरबसल्या १२२७ कोटी २५ लाख रुपयांची बिले भरली आहेत.

लॉकडाऊनमुळे महावितरणकडून २३ मार्चपासून वीजबिलांची कागदी छपाई व वितरण बंद करण्यात आले आहे. मात्र मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबिल पाठवण्यात येत आहे. क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीजबिल भरण्यासाठी ऑनलाईन प्रणालीतील सर्व पर्याय आता निःशुल्क आहेत.

नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा 'ऑनलाईन' भरणा करण्यासाठी याआधी ५०० रुपयांपेक्षा अधिक रक्कमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजीटल वॉलेटच्या माध्यमातून पैसे भरणे निःशुल्क आहे. तसेच ऑनलाईन बिलींगवर ०.२५ टक्के सूट दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत देण्यात येत आहे. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर 'ऑनलाईन' पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणने वीजग्राहकांसाठी तयार केलेले मोबाईल अॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. प्रामुख्याने एकाच खात्यातून ग्राहकांना स्वतःच्या अनेक वीजबिलांचा भरणा करण्याची सोय आहे. चालू व मागील वीजबिल पाहणे आणि तसेच त्याचे पैसे जमा करणे सोईचे झाले आहे. त्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच भरलेल्या पावतीचा तपशीलही वेबसाईट व अॅपवर उपलब्ध आहे.

परिमंडळनिहाय ग्राहकसंख्या व रक्कम पुढीलप्रमाणे

पुणे– १३.५० लाख – २६६.२९ कोटी, भांडूप– १०.९९ लाख – २३३.६० कोटी, कल्याण– १०.२५ लाख – १६४.३९ कोटी, नाशिक– ५.६५ लाख – ९४.४१ कोटी, बारामती– ५.६३ लाख – ७१.०९ कोटी, कोल्हापूर– ४.२२ लाख – ८४.९६ कोटी, नागपूर– ४.०५ लाख – ७०.७५ कोटी, जळगाव- ३.२५ लाख – ४७.८७ कोटी, औरंगाबाद– २.३० लाख – ४३.७५ कोटी, अकोला– २.२७ लाख – २७.१० कोटी, अमरावती- २.२१ लाख – २३.४८ कोटी, लातूर- १.९२ लाख – २५.५३ कोटी, कोकण- १.८८ लाख – २२.९२ कोटी, चंद्रपूर- १.७९ लाख – १५.३६ कोटी, गोंदिया- १.७९ लाख – १२.८२ कोटी, नांदेड- १.५८ लाख – २२.९१ कोटी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.