ETV Bharat / city

St employees join office - संप सोडून आज ७ हजार ५४१ एसटी कर्मचारी कामावर हजर, ९३ बसेस राज्यभर धावल्या - एसटी कर्मचारी कामावर

आज २२ मार्गांवर ९३ बसेस धावल्या असून २ हजार ४५७ प्रवाशांनी प्रवास केला आहे. या शिवाय कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या (St employees join office) वाढत असून आज ७ हजार ५४१ कर्मचारी (St employees) कर्तव्यावर हजर झाले आहे.

St employees join office
एसटी कर्मचारी कामावर हजर
author img

By

Published : Nov 18, 2021, 10:20 PM IST

मुंबई - गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (St workers strike) अद्याप तोडगा निघालेला नाही. मात्र, आता राज्यभरात एसटी बसेस काही प्रमाणात रस्त्यांवर धावायला लागल्या आहेत. आज २२ मार्गांवर ९३ बसेस धावल्या असून २ हजार ४५७ प्रवाशांनी प्रवास केला आहे. या शिवाय कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या (St employees join office) वाढत असून आज ७ हजार ५४१ कर्मचारी (St employees) कर्तव्यावर हजर झाले आहे.

हेही वाचा - Political Analysis : उत्तर प्रदेश निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रात उमटतायेत का?

७ हजार ५४१ कर्मचारी कामावर हजर

एसटी महामंडळ (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलिनी करण्याचा मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपामुळे (St employees strike) एसटीच्या राज्यभरातील वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी न्यायालयाचे निर्देश असताना सुद्धा कामगार संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाकडून जोरदार कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यभरात ४ हजार ३४९ कर्माचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एसटी कर्मचारी आणि एसटीतील रोजंदार कामगारांचा समावेश आहे. या कारवाईच्या धास्तीने कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. आज राज्यभरात ७ हजार ५४१ कर्मचारी कामावर हजर झाले आहे (St employees join office).

आज एसटीतून ८२४ प्रवाशांनी केला प्रवास

एसटी महामंडळाने (msrtc) दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यभरातून २२ मार्गांवर, शिवनेरी, शिवशाही आणि साध्या अशा एकूण ९३ बसेस धावल्या आहेत. या बसेसमधून २ हजार ४५७ प्रवाशांनी प्रवास केला आहे. आजपेक्षा काल दिवसभरात जास्त बसेस सुटल्या होत्या. काल राज्यभरातून १०७ बसेस सोडण्यात आल्या होत्या, ज्यामधून २ हजार ८९९ प्रवाशांनी प्रवास केला होता.

हेही वाचा - MAHARASHTRA CORONA UPDATE नवीन 963 कोरोना रुग्णांची नोंद; 24 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.