ETV Bharat / city

'तौक्ते' चक्रीवादळामुळे 61 मेल-एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द - 61 mail-express

'तौक्ते' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता महाराष्ट्रसह गुजरातमधून धावणाऱ्या तब्बल 61 मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मेल-एक्स्प्रेस रेल्वे
मेल-एक्स्प्रेस रेल्वे
author img

By

Published : May 16, 2021, 4:02 PM IST

मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 'तौक्ते' चक्रीवादळ कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि गुजरातमध्ये धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वादळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. 'तौक्ते' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता महाराष्ट्रसह गुजरातमधून धावणाऱ्या तब्बल 61 मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

चक्रीवादळामुळे 61 मेल-एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द

बहुतांश गाड्या शॉर्ट टर्मिनेट -

दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 'तौक्ते' चक्रीवादळ अधिक सक्रिय झाले असून, ते गुजरातच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. या वादळाचा तडाखा गुजरातसह महाराष्ट्रालाही बसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. तसेच समुद्रातून हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने तब्बल 61 मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच बहुतांश गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहेत.

१६ ते २० मेपर्यंत गाड्या रद्द -

पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातून सुटणाऱ्या जवळपास ६१ रेल्वे रद्द केल्या आहेत. यात मुंबई, पुणे सह दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. १७ व १८ मे रोजी प्रवास सुरू करणारी व पुणे स्थानकावरून धावणारी राजकोट सिकंदराबाद-राजकोट एक्स्प्रेस, राजकोट-वेरावल एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे. तसेच मुंबई आणि उपनगरातील लोकल सेवेवरसुद्धा पश्चिम रेल्वे प्रशासनाची नजर आहे. रविवार असल्याने प्रवासी संख्या कमी आहे. तसेच लोकल फेऱ्यांची संख्या कमी आहे. तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नयेत, त्यासाठी रेल्वे अभियांत्रिक पथकसह सर्व यंत्रणा तैनात आहे.

वाहतुकीत बदल -

नागरिकांना समुद्र किनारी न जाण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. मुंबई पोलीस कर्मचारी आणि यांच्यासोबत अतिरिक्त पोलीस बल, एनडीआरएफ, एसआरपीएफल तसेच होमगार्ड तैनात करण्यात आलेले आहे. ज्या ठिकाणी पाणी साचते अशा ठिकाणी लोकांनी जाऊ नये, असेही आवाहन केले आहे. तसेच वाहतूक विभागाकडून ट्रॅफिकमध्ये बदल करण्यात आलेले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.