ETV Bharat / city

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 6 ठराव मंजूर, उद्धव ठाकरेंना मिळाला 'हा' मोठा अधिकार - शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी

काल शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत ( Shiv Sena national executive council news ) काही महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. 6 ठराव मंजूर झाले असून एका ठरावात बंडखोरांवर कारवाईचे संपूर्ण अधिकार शिवसेना पक्ष प्रमुखांना देण्यात आले. त्यामुळे, आता पक्ष प्रमुख या आमदारांवर काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या ठरावाबरोबरच इतर ठरावही करण्यात आले आहेत. याबाबत आपण जाणून घेऊ या.

Shiv Sena national executive council meeting
शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी सहा ठराव
author img

By

Published : Jun 26, 2022, 6:56 AM IST

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने ( Shiv Sena national executive council meeting ) राज्यात राजकीय उलथापालथ निर्माण झाली आहे. बंडखोर आमदारांना पक्षात परत आणण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत होती. बंडखोर आमदारांना ( 6 resolutions approved in Shiv Sena meeting ) मुंबईत येण्याचे आव्हान करण्यात आले. चर्चेतून मार्ग काढण्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यात फारसा यश मिळालेला नाही. काल शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत ( Shiv Sena national executive council news ) काही महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. 6 ठराव मंजूर झाले असून एका ठरावात बंडखोरांवर कारवाईचे संपूर्ण अधिकार शिवसेना पक्ष प्रमुखांना देण्यात आले. त्यामुळे, आता पक्ष प्रमुख या आमदारांवर काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या ठरावाबरोबरच इतर ठरावही करण्यात आले आहेत. याबाबत आपण जाणून घेऊ या.

हेही वाचा - Eknath Shinde : 'मविआसारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठी लढतोय'

1) बंडखोरांवर कारवाईचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना - पहिल्या ठरावात म्हटले आहे की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून पक्षाची धुरा स्वीकारल्यापासून शिवसैनिकांना दिलेले प्रभावी नेतृत्व आणि वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन, परिणामी शिवसेनेचा सर्वत्र वाढलेला लौकिक व मानसन्मान याबद्दल शिवसेनेची ही राष्ट्रीय कार्यकारिणी उद्धव ठाकरे यांच्या प्रती ऋण व्यक्त करीत आहे. पुढील काळातही त्यांनी पक्षाला असेच मार्गदर्शन करावे, अशी नम्र विनंती करत आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या काही आमदारांनी अलीकडे केलेल्या गद्दारीचाही कार्यकारिणी तीव्र धिक्कार करून उद्धव ठाकरे यांच्या मागे संपूर्ण पक्षसंघटना भक्कमपणे उभी असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करीत आहे. त्याचप्रमाणे सद्यस्थितीवर संपूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी निर्णय घेण्याचे व अंमलबजावणीचे संपूर्ण अधिकार शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात येत आहेत. हा ठराव अजय चौधरी यांनी मांडला आणि याला अनुमोदन रवींद्र वायकर आणि उदयसिंह राजपूत यांनी दिले.

2) उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव - दुसऱ्या ठरावात म्हटले आहे की, शिवसेनेची ही राष्ट्रीय कार्यकारिणी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बजावलेल्या प्रभावी कामगिरीबद्दल व देशात, तसेच जगभरात संपादन केलेल्या गौरवाबद्दल सार्थ अभिमान प्रकट करत आहे. विशेषतः कोरोना काळात जनतेचे संगोपन चांगल्या प्रकारे केल्याबद्दल, महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीच्या अभूतपूर्व यशाबद्दल आणि महाराष्ट्राला विकासात, निसर्ग रक्षणात अग्रेसर केल्याबद्दल ही कार्यकारिणी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. हा ठराव आमदार भास्कर जाधव यांनी मांडला आणि याला राजन साळवी आणि कैलास पाटील यांनी अनुमोदन दिले.

3) आगामी सर्व निवडणुकांत भगवा फडकविणार - शिवसेनेची ही राष्ट्रीय कार्यकारिणी आगामी काळात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा
परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायती निवडणुका जोमाने लढवून सर्वत्र शिवसेनेचा भगवा झेंडा डौलाने फडकविण्याचा निर्धार करीत आहे. हा ठराव आमदार सुनील राऊत यांनी मांडला तर याला अनुमोदन नितीन देशमुख आणि राहुल पाटील यांनी दिले.

4) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास - शिवसेनेची ही राष्ट्रीय कार्यकारिणी मुंबई शहर त उपनगरात झालेल्या प्रचंड सुधारणा, कोस्टल रोड, मेट्रो रेल मार्ग, सुशोभीकरणाचे विविध प्रकल्प, विशेषतः ५०० फुटांच्या सर्व घरांना दिलेली करमाफी अशा लोकहिताच्या निर्णयांबद्दल महाराष्ट्र सरकारचे व मुंबई महापालिकेचे आभार मानत आहे. तसेच, या यशाबद्दल उद्धव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन करत आहे. यापुढेही या दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचा निरंतर विकास होत राहील, असा विश्‍वास व्यक्त करत आहे. हा ठराव सुनील प्रभू मांडला. तर याला रमेश कोरगावकर व प्रकाश फारतेकर यांनी अनुमोदन दिले.

5) बाळासाहेब व शिवसेनेचे नाव बंडखोरांना वापरता येणार नाही - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांनी शिवसेनेची निर्मिती झाली. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्या वेगळ्या करता येणार नाहीत आणि कोणी वेगळे करू शकत नाही. म्हणून शिवसेना व बाळासाहेब ठाकरे हे नाव शिवसेना पक्षा व्यतिरिक्त कोणीही वापरू शकत नाही. हा ठराव अरविंद सावंत यांनी मांडला. तर, याला अनुमोदन दिले धैर्यशील माने व श्रीरंग बारणे यांनी.

6) मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाची प्रतारणा नाही - शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे व राहील. हिंदुत्वाच्या विचारांची शिवसेना प्रामाणिक होती व राहील. त्याचप्रमाणे मराठी माणसाच्या अस्मितेशी शिवसेनेने कधी प्रतारणा केली नाही व करणार नाही. शिवसेनेशी बेईमानी करणारे कोणीही असो, कितीही मोठी असो त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना आहेत. त्यासाठी ही कार्यकारणी उद्धव ठाकरे यांच्या नेहमी पाठीशी राहील.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात गुजरातमध्ये गुप्त भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.