ETV Bharat / city

Mumbai Corona Update : दिवसभरात मुंबईत कोरोनाचे 592 नवे रुग्ण, 7 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत आज (शनिवारी) 592 नवे रुग्ण आढळून आले असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

mumbai  corona
मुंबईत कोरोना
author img

By

Published : Jan 2, 2021, 8:10 PM IST

मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. 16 नोव्हेंबरला रुग्ण संख्या 409 पर्यंत खाली आली होती. आज (शनिवारी) मुंबईत 592 नवे रुग्ण आढळून आले असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

7 हजार 892 सक्रिय रुग्ण -

मुंबईत आज कोरोनाचे 592 नवे रुग्ण आढळून आले असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 94 हजार 659 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 11 हजार 132 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 695 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 74 हजार 767 वर गेला आहे. सध्या मुंबईत 7 हजार 892 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 361 दिवसांवर -

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 361, दिवस तर सरासरी दर 0.21 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 283 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 2 हजार 462 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 23 लाख 82 हजार 420 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

अशी वाढली रुग्णसंख्या-
१६ नोव्हेंबर - ४०९
१७ नोव्हेंबर - ५४१
१८ नोव्हेंबर - ८७१
१९ नोव्हेंबर - ९२४
२० नोव्हेंबर - १०३१
२१ नोव्हेंबर - १०९२
२२ नोव्हेंबर - ११३५
२३ नोव्हेंबर - ८००

कमी नोंद झालेली रुग्णसंख्या -
7 नोव्हेंबर 576 रुग्ण
2 नोव्हेंबर 706 रुग्ण
3 नोव्हेंबर 746 रुग्ण
6 नोव्हेंबर 792 रुग्ण
9 नोव्हेंबर 599 रुग्ण
10 नोव्हेंबर 535 रुग्ण
14 नोव्हेंबर 574 रुग्ण
16 नोव्हेंबर 409 रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.