मुंबई - शहरात मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. 16 नोव्हेंबरला 409 तर 18 जानेवारीला 395 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आज (गुरूवारी) मुंबईत 527 नवे रुग्ण आढळून आले असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
6 हजार 667 सक्रिय रुग्ण -
मुंबईत आज कोरोनाचे 527 नवे रुग्ण आढळून आले असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 4 हजार 649 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 11 हजार 276 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 530 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 85 हजार 810 वर गेला आहे. सध्या मुंबईत 6 हजार 667 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 435 दिवसांवर -
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 435, दिवस तर सरासरी दर 0.21 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 150 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. 2 हजार 254 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. कोरोनाचे निदान करण्यासाठी 26 लाख 57 हजार 668 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
कमी नोंद झालेली रुग्णसंख्या -
2 नोव्हेंबर | 706 रुग्ण |
3 नोव्हेंबर | 746 रुग्ण |
6 नोव्हेंबर | 792 रुग्ण |
7 नोव्हेंबर | 576 रुग्ण |
9 नोव्हेंबर | 599 रुग्ण |
10 नोव्हेंबर | 535 रुग्ण |
14 नोव्हेंबर | 574 रुग्ण |
16 नोव्हेंबर | 409 रुग्ण |
18 जानेवारी | 395 रुग्ण |