ETV Bharat / city

राज्यात 28 मेपर्यंत 5126 लोकांना म्यूकरमायकोसिसची लागण; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती - state Mucormycosis news

28 मेपर्यंत राज्यात 5126 लोकांना म्यूकरमायकोसिसची लागण झाल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली.

Mucormycosis
Mucormycosis
author img

By

Published : Jun 8, 2021, 7:21 PM IST

Updated : Jun 23, 2021, 2:27 PM IST

मुंबई - कोरोनाच्या विविध समस्यांसंदर्भातील याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. राज्य सरकारच्यावतीनं काळ्या बुरशीसंदर्भात राज्यातील परिस्थितीचा अहवाल न्यायालयापुढे सादर केला. त्यात 28 मेपर्यंत राज्यात 5126 लोकांना म्यूकरमायकोसिसची लागण झाल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टाला दिली. राज्यात सध्या 42 सरकारी, तर 419 खासगी रुग्णालयात म्यूकरमायकोसिसचे उपचार सुरू असल्याचे राज्य सरकारने सांगितले.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधान भेटीत मराठा समाजावर फोकस नाही; मराठा कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया

म्यूकरमायकोसिसवरील औषध 'अँम्पोटेरेसिन-बी'चे 91 हजार 470 डोस आजवर महाराष्ट्रात देण्यात आले, अशी आकडेवारी केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केली. केंद्र सरकारकडे यावरील औषधांच्या 19 ऑर्डर दिल्या आहेत. हाफकिनकडूनं 10 जूनपर्यंत औषधांचे 40 हजार डोस राज्यासाठी वितरीत केले जातीलं, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वकिलांनी केला.

  • या शहरात रुग्ण जास्त -

नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिकमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. पुणे दुसऱया क्रमांकावर असून, पुण्यात 834 रुग्ण म्यूकरमायकोसिसने बाधित असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाला राज्य सरकारने सांगितले आहे. तसेच राज्य सरकारने रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी न्यायालयात सादर केली.

  • भारताला म्यूकरमायकोसिसचा धोका जास्त -

जगाच्या तुलनेत भारतात 'काळ्या बुरशी'चा धोका 80 टक्के अधिक आहे. त्याचे कारण भारतात मधूमेह रुग्णांची संख्या फार मोठी आहे. मधुमेह असलेली व्यक्ती जर कोरोनाग्रस्त असेल तर त्या रुग्णाला म्यूकरमायकोसिसचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते, असे राज्य सरकारच्यावतीनं महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात माहिती दिली.

हेही वाचा - पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट राजकीय तडजोडीसाठी का?, उदयनराजेंचा सवाल

Last Updated : Jun 23, 2021, 2:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.