ETV Bharat / city

मुंबई पोलीस दलातील 5 हजार कर्मचारी लस घेण्यासाठी करताहेत टाळाटाळ! - मोफत लसीकरण

41 हजार मनुष्यबळ असलेल्या मुंबई पोलीस खात्यातील जवळपास 5000 पोलीस अधिकारी व अंमलदारांनी कोरोना लसीचा पहिला डोस न घेतल्याची बाब समोर आली आहे.

मुंबई पोलीस
मुंबई पोलीस
author img

By

Published : May 13, 2021, 5:11 PM IST

मुंबई - कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व प्रयत्न केले जात असताना फ्रंटलाईन वॉरीयर म्हणून पोलिसांना कोरोनाची लस देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. मात्र अद्यापही मुंबई पोलीस खात्यात काहीजण लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी मुंबई शहरातील वेगवेगळ्या पोलीस उपायुक्तांना या संदर्भात लस न घेतलेल्या पोलीस अधिकारी अंमलदार यांची माहिती मागवली असून यातील प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांनी लस का घेतली नाही, याचे कारण देण्यास सांगितले आहे.

5000 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी लस घेतली नाही
मुंबई पोलीस खात्याच्या मनुष्यबळापैकी आतापर्यंत 36 हजार 93 पोलिसांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे. तर 26 हजार 277 पोलिसांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आलेला आहे. तब्बल 41 हजार मनुष्यबळ असलेल्या मुंबई पोलीस खात्यातील जवळपास 5000 पोलीस अधिकारी व अंमलदारांनी कोरोना लसीचा पहिला डोस न घेतल्याची बाब समोर आली आहे. कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊन हा 31 मे पर्यंत वाढवण्यात आलेला असताना फ्रंटलाईन वॉरीयर म्हणून काम करणाऱ्या पोलीस खात्यामध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र पहिल्या टप्प्यात 87 टक्के लसीकरण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण हे केवळ 64 टक्केच करण्यात आले असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. असे असताना काही पोलीस अधिकारी व अंमलदार कोरोनाची पहिली लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याची बाब समोर आल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तांकडून याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत 115 पोलीस शहीद
कोरोना संक्रमण मुंबई शहरात पसरल्यानंतर लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. यादरम्यान मुंबई शहरात रस्त्यावर 24 तास आपले कर्तव्य बजावणाऱ्या मुंबई पोलीस खात्यातील हजारो पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे आतापर्यंत 115 पोलीस हे मृत्युमूखी पडलेले असून यामध्ये 15 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा - राष्ट्रीय पुरस्कार विजेती "तेंडल्या" चित्रपटाची टीम कर्ज फेडण्यासाठी करतेय शेती

हेही वाचा - 'ब्रेक दि चेन' अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.