मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मद्यावरील मुल्यवर्धित करात (व्हॅट) ५ टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात मद्य महागणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेमधून घरातील महिलेच्या नावावर घराची नोंदणी झाल्यास मुद्रांक शुल्कामध्ये सवलत मिळणार आहे. त्यामुळे राज्याचे एक हजार कोटी रुपयांचे उत्पन्न कमी होणार आहे.
![liquor tax hike](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10920378_asdd.jpg)
हेही वाचा-दुचाकी अन् सिलेंडरला फासावर लटकवत श्राद्ध घालून दरवाढी विरोधात अनोखे आंदोलन
तर दुसरीकडे राज्य सरकारने मद्यावरील व्हॅटमध्ये ५ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे राज्य सरकारला १ हजार कोटी रुपये अतिरिक्त मिळू शकणार आहेत, असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
मूल्यवर्धित कर कायद्याच्या कलम ४१/५ नुसार मद्यावर सध्या असलेल्या मूल्यवर्धित कराचा दर ३५ वरून ४० टक्के वाढवण्याचा अर्थसंकल्पात प्रस्ताव करण्यात आला आहे.
हेही वाचा-महा अर्थसंकल्प २०२१ : जागतिक महिली दिनी राज्य सरकारची शाळकरी मुलींना मोठी भेट