ETV Bharat / city

मुंबईत 5 बोगस डॉक्टरांना अटक; गुन्हे शाखेची कारवाई - वैद्यकीय परवाना

मुंबईतील गोवंडी आणि शिवाजीनगर परिसरातील ५ बोगस डाॅक्टरांवर मुंबई गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. शिवाजीनगर आणि गोवंडी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना आणि कोणत्याही प्रकारचं वैद्यकीय प्रशिक्षण नसताना रुग्णांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बोगस डाॅक्टरवर कारवाईचा बडगा उटलला आहे.

मुंबईत 5 बोगस डॉक्टरांना अटक
मुंबईत 5 बोगस डॉक्टरांना अटक
author img

By

Published : Aug 20, 2021, 8:56 AM IST

Updated : Aug 20, 2021, 9:10 AM IST

मुंबई - मुंबईतील गोवंडी आणि शिवाजीनगर परिसरातील ५ बोगस डाॅक्टरांवर मुंबई गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. शिवाजीनगर आणि गोवंडी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना आणि कोणत्याही प्रकारचं वैद्यकीय प्रशिक्षण नसताना रुग्णांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बोगस डाॅक्टरवर कारवाईचा बडगा उटलला आहे.

मुंबईत 5 बोगस डॉक्टरांना अटक; गुन्हे शाखेची कारवाई

वैद्यकीय परवाना नसतानाही 5 बोगस डाॅक्टरांचा जिवघेणा खेळ

मुंबईतील शिवाजीनगर आणि गोवंडी भागातून या 5 बोगस डाॅक्टरांना अटक करण्यात आली आहे. सतत गजबजलेल्या अशा शिवाजीनगर तसेच गोवंडी भागात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातच करोनामुळे कंबरडे मोडल्याने आर्थिक चणचण असलेल्या लोकांच्या मजबूरीचा फायदा घेवून हे 5 मुन्ना भाई MBBS कोरोना बाधित रुग्णांवर देखील उपाचर करत होते की काय असा संशय मुंबई पोलिसांना आहे. कारण कोरोना रुग्णांवर उपचार करण्याकरता वापरली जाणारे औषधे अँन्टीबायोटिक टॅबलेट्स, सर्जिकल टे, पॅरसिटॉमॉल डेक्झा टॅबलेट्स, टोरमॉक्झान 500 एम.जी, सिरिन्स सलायन बॉटल्स्‌, अन्टॉसिड्स टॅबलेट, बायेमेडीकल वेस्ट मटेरियल, रॅन्टीडाईनहायड़ोक्लोराइड इंजेक्शन ही औषधे पोलिसांनी या बोगस डाॅक्टरांकडून जप्त केली आहेत. यातील एक तरी औषध कमी जास्त दिले गेले तर रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. याकरता वैद्यकीय शिक्षण गरजेचे असते. पण या 5 बोगस डाॅक्टरांकडे कोणताही वैद्यकीय परवाना नसतानाही या 5 बोगस डाॅक्टरांचा हा जिवघेणा खेळ गेली काही वर्षे सुरुच होता.

बोगस डॉक्टरांना अटक
बोगस डॉक्टरांना अटक

पोलिसांनी यांना रंगेहाथ पकडले

मुंबई पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली आणि माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यविभागाच्या मदतीने या 5 बोगस डाॅक्टरांच्या क्लिनकवर धाड टाकली. त्यावेळेस या 5 बोगस डॉक्टरांकडे कोणताही अधिकृत वैद्यकिय परवाना नसताना तसेच महाराष्ट मेडीकल कौन्सिलमध्ये नोंदणी नसताना डॉक्टर असल्याचे भासवुन बेकायदेशिररित्या विविध आजारावरील रूग्णांना औषधे इंजेक्शन देत औषधेपचार करताना पोलिसांनी यांना रंगेहाथ पकडले.

बोगस डॉक्टरांना अटक
बोगस डॉक्टरांना अटक

महानगरपालिका, 'एम-वाड पूर्व' येथील सहाय्यक वैद्यकिय अधिकारीही

बोगस डॉक्टरांविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून बोगस डॉक्टरांना पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई मुंबई क्राईम ब्रांच युनिट 6 चे पोलीस निरीक्षक हणमंत ननावरे आणि नितिन सावंत यांनी महत्वाची कामगिरी केली असून त्यांना या मोठ्या कारवाईत बृहन्मुंबई महानगरपालिका, “एम-वाड पूर्व' येथील सहाय्यक वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रिया कोळी यांच्यासह 5 डाॅक्टरांचे वैद्यकीय पथकाने मदत केली. मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे हजारो, लाखो मुंबईकरांचे प्राण वाचले.

Last Updated : Aug 20, 2021, 9:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.