ETV Bharat / city

मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 448 नवे रुग्ण, 4 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत आज (रविवारी) कोरोनाचे 448 नवे रुग्ण आढळून आले असून 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

new corona patients
new corona patients
author img

By

Published : Feb 7, 2021, 9:04 PM IST

मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दहा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. आज (रविवारी) मुंबईत कोरोनाचे 448 नवे रुग्ण आढळून आले असून 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

कोरोना रुग्णांची आकडेवारी -

मुंबईत आज 448 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 11 हजार 874 वर पोहचला आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 390 वर पोहचला आहे. 711 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 94 हजार 128 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 5,441 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 572 दिवस -

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 572 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 158 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 1 हजार 869 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 29 लाख 10 हजार 618 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.