ETV Bharat / city

मुंबई महापालिकेच्या अनेक शाळा मुख्याध्यापकाविना, हिंदी माध्यमाच्या 40 शाळेत मुख्याध्यापक नाहीत - मुंबई महापालिकेच्या अनेक शाळा मुख्याध्यापकाविना

मुंबईत 40 हिंदी भाषिक शाळेत मुख्याध्यापक नाहीत (40 Hindi medium schools without headmasters). हजारो विद्यार्थी मुख्याध्यापकविना आहेत. महापालिकेच्या शिक्षण विभागात, स्वतःचा संशोधन विभाग आहे. 2300 कोटी महापालिकेचे शैक्षणिक बजेट आहे. तरीही महापालिका शिक्षण विभाग प्रगतीच्या वाटेवर कायम मागे राहत आलेला आहे (Mumbai Municipal Corporation schools). महापालिकेच्या सर्व माध्यमात सुमारे 1000 शिक्षकांची कमतरता आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळा आता मुख्याध्यापकाविना

author img

By

Published : Sep 19, 2022, 5:00 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेने शिक्षण विभागाचा नुकता हिंदी दिवस उच्च शिक्षण अधिकारी मंडळींच्या उपस्थितीत पार पडला. शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी शिक्षक आणि मुख्याध्यापक त्यात उपस्थित होते. मात्र त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली की, 40 हिंदी भाषिक शाळेत मुख्याध्यापक नाहीत (40 Hindi medium schools without headmasters). हजारो विद्यार्थी मुख्याध्यापकविना आहेत. हिंदी दिवस मात्र जल्लोषात साजरा केला जातो. शिक्षक मंडळी दबक्या आवाजात याचीच चर्चा करीत आहेत. कारण त्यांच्या माथी पुन्हा अतिरिक्त कामाचा भार येतो. परिणामी पालक शिक्षक यांनी टीकेचा सूर काढला आहे.

सुमारे 1000 शिक्षकांची कमतरता - मुंबई महापालिका आशिया खंडातील नावाजलेली आणि जुनी महापालिका आहे. 1888 च्या कायद्याने तिची स्थापना झाली आहे. ही एकमेव अशी महापालिका आहे जी आठ भाषेत शिक्षण देते. या महापालिकेच्या शिक्षण विभागात, स्वतःचा संशोधन विभाग आहे. 2300 कोटी महापालिकेचे शैक्षणिक बजेट आहे. तरीही महापालिका शिक्षण विभाग प्रगतीच्या वाटेवर कायम मागे राहत आलेला आहे. महापालिकेच्या सर्व माध्यमात सुमारे 1000 शिक्षकांची कमतरता आहे. असे शिक्षकांचे म्हणणे आहे. 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक एका तुकडीला या प्रमाणानुसार तीस हजार विद्यार्थ्यांना शिक्षक नाहीत. याची ओरड पालक सातत्याने करतात. महापालिका आयुक्त याबद्दल ठोस धोरण घेऊन शिक्षकांची कायमस्वरूपी भरती करत नाहीत. आता तर दहा हजार विद्यार्थी आणि 40 शाळा मुख्याध्यापकांपासून वंचित आहेत. परिणामी पुन्हा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहेत, अशी टीका सर्वत्र होत आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळा आता मुख्याध्यापकाविना
मुंबई महापालिकेच्या शाळा मुख्याध्यापकाविना

हजारो विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापकाविना - मुंबई महानगरपालिकेच्या सर्व माध्यमाचे मिळून तीन लाख विद्यार्थी यंदा पटावर आहेत. मराठीच्या 280 शाळा व 34 हजार विद्यार्थी तर 1586 शिक्षक आहेत. तर हिंदीच्या 226 शाळा व 57 हजार विद्यार्थी आणि 2427 शिक्षक आहेत. उर्दूच्या 192 शाळा व 58 हजार विद्यार्थी आणि 2097 शिक्षक आहेत. या सर्व शाळांमध्ये 40 हिंदी भाषिक शाळा अशा आहेत की जिथे मुख्याध्यापक नाहीत. मुख्याध्यापक नसल्यामुळे शाळेचे प्रशासन चालवायचे कुणी असा मोठा प्रश्न शिक्षक आणि शाळा इन्चार्ज यांच्यासमोर उभा राहिला आहे. निर्णय मुख्याध्यापक घेतात. तेच नाहीत तर शाळेच्या विकासाचे निर्णय कुणी घ्यायचे याबाबत अनुभवी शिक्षकांत संभ्रम आहे.

मुख्याध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान - याबद्दल मुंबई शिक्षक सभेचे नेते आबीद शेख यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना टिपणी केली. मुख्याध्यापक जेव्हा शाळेमध्ये असतात तेव्हा शाळेचे संपूर्ण प्रशासन त्याचे नेतृत्व मुख्याध्यापक करतात. शिक्षकांना मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शाळेची देखभाल शाळेमध्ये सर्व इत्यंभूत गोष्टी आहेत किंवा नाहीत याची सर्व माहिती त्यांनाच असते. मात्र ते नसल्यामुळे आता शाळेच्या इन्चार्जला दुहेरी काम करावे लागते. याबाबत विक्रोळी येथील महापालिका शाळेमधील विद्यार्थ्यांचे पालक मुरलीधर मांडवकर यांनी महापालिकेचे मुख्याध्यापक नसल्यामुळे मुलांचे नुकसान होत असल्याबद्दल टीका केली. त्यांचं म्हणणं आहे की, शिक्षक पद भरले नाही शिक्षकविना आमचे मुले तशीच आहेत. आता शिक्षकांसोबत मुख्याध्यापकदेखील नाहीत. त्यांच्यामुळे आमच्या मुलाबाळांना कोणीच वाली नाही. म्हणजे एखाद दोन शिक्षक शाळेत असतात त्यांनीच आता हे सगळे काम करायचे. त्याच्यामुळे तो शिक्षक घायकुतीला येतो. मग दर्जा बिघडतो आणि आमच्या मुलांना धड चांगले दर्जेदार शिक्षण मिळत नाही.

मुंबई महापालिकेच्या शाळा आता मुख्याध्यापकाविना, अधिकारी म्हणतात पदभरती सुरू

प्रशासन म्हणतय मुख्याध्यापक पद भरणे सुरू - याबाबत महापालिका मुख्य शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांच्याशी ईटीवीभारतने विचारणा केली असता त्यांनी खुलासा केला की , महापालिकेच्या हिंदी माध्यमाच्या शाळांपैकी 40 शाळांमध्ये मुख्याध्यापक नाहीत. मात्र आता आपण पात्र शिक्षकांना मुख्याध्यापकपदी नेमणे सुरू केलेले आहे. काही बढती होऊन मुख्याध्यापक पदावर आता कार्यरत होत आहेत. लवकरच मुख्याध्यापकाच्या पदाची पूर्तता शिक्षण विभाग करील अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.