मुंबई - मुंबई वांद्रे वरळी समुद्र सेतू जवळ चार फूट लांब डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या बीएमसी आणि कोस्टल रोड कर्मचाऱ्यांनी जेसीबी मशीनचा वापर करून डॉल्फिनला तेथून हलवले. मृत पावलेल्या या डॉल्फिन माशाला स्थानिक लोकांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास समुद्र किनाऱ्याजवळ पाहिले होते. त्यानंतर स्थानिकांनी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. हा डॉल्फिन मासा मुंबईचा समुद्र किनारी कुठून आला व त्यानंतर त्याचा मृत्यू कसा झाला याचा शोध घेण्याचे कार्य आता सुरु आहे.
वांद्रे-वरळी सी लिंकवर आढळला 4 फूट मृत डॉल्फिन - डॉल्फिन
मुंबई वांद्रे वरळी समुद्र सेतू जवळ चार फूट लांब डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळला आहे.