ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाच्या प्रतिंबधात्मक लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून सुरू - कोविन अॅप आणि लसीकरण

मुंबईत आजपासून कोविड सेंटरमध्ये लसीकरण सुरू. सकाळी ९ वाजल्यापासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील इतर आजार असलेल्या नागरिकांची लसीकरणासाठी कोविन अॅपवर नोंदणी सुरू होणार आहे. कोविन पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून सुरू
लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून सुरू
author img

By

Published : Mar 1, 2021, 7:36 AM IST

मुंबई - कोरोनावरील लसीकरणाचा तीसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. मुंबईत ३ खासगी, तर जम्बो कोविड सेंटरमध्ये या लसीकरणाला सुरुवात होत आहे. पालिका व इतर रुग्णालयात २ मार्चपासून लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी आज सकाळी ९ वाजल्यापासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील इतर आजार असलेल्या नागरिकांची लसीकरणासाठी कोविन अॅपवर नोंदणी सुरू होणार आहे. कोविन पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

तिसऱ्या टप्प्याचे लसीकरण

केंद्र शासनाच्या आदेशानुसार 'कोविड-१९' लसीकरणाचा तिसरा टप्पा आज(सोमवार) पासून सुरू होत आहे. या टप्प्यात वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच, वयाची ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (comorbidity) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणाचा तिसरा टप्पा महापालिकेच्या व शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही राबविण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांपैकी ज्या रुग्णालयांमध्ये 'जन आरोग्य योजना' व केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबविण्यात येत आहेत, अशा खासगी रुग्णालयांना या लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.

'या' ठिकाणी लसीकरण-

१ मार्चपासून बी.के.सी जंबो रुग्णालय, वांद्रे, मुलुंड जंबो कोविड रुग्णालय, नेस्को जंबो कोविड रुग्णालय, गोरेगाव, सेवन हिल्स रुग्णालय, अंधेरी, दहीसर जंबो रुग्णालय या चार ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील विनामूल्य लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. तर, महानगरपालिकेच्या अखत्यारीतील इतर १९ लसीकरण केंद्रांमध्ये २ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यातील विनामूल्य लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.

खासगी रुग्णालयात टप्प्याटप्प्याने वाढ-

केंद्रशासनाची 'जन आरोग्य योजना' राबविण्यात येणाऱ्या, तसेच केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५३ खासगी रुग्णालयांची यादी प्राप्त झाली आहे. या रुग्णालयांमध्ये शासकीय नियमांनुसार पुरेशी जागा, मनुष्यबळ, तसेच लसीकरणामुळे होणारे संभाव्य विपरित परिणाम, व्यवस्थापन इत्यादींसाठी सुविधा उपलब्धता या बाबींचे सर्व्हेक्षण करून लसीकरण केंद्र म्हणून निवड करण्यात येईल. त्यानंतर टप्या टप्याने या केंद्रांमध्ये लसीकरण सुरू करण्यात येईल.

..येथे शुल्क घेऊन लसीकरण

शासन आदेशान्वये बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जी खासगी रुग्णालये 'जन आरोग्य विमा योजना', केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असतील अशा खासगी रुग्णालयांमध्ये ६० वर्षे वय पूर्ण झालेले जेष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील सह-व्याधी असलेल्या नागरिकांचे लसीकरण १ मार्चपासून २५० एवढे शुल्क आकारून सुरू करण्यात येणार आहे. आजपासून एच.जे. दोशी हिंदू सभा रुग्णालय, घाटकोपर, के.जे. सोमय्या वैद्यकीय महाविद्यालय, शीव, तसेच एस.आर.सी.सी. चिल्ड्रन रुग्णालय, महालक्ष्मी या ठिकाणी शुल्क आकारून लसीकरण केले जाणार आहे.

अशी करा नोंदणी

लसीकरणासाठी कोविन अॅपवर नोंदणी बंधनकारक आहे. नोंदणी करताना नागरिकांनी आपली जन्म तारीख व इतर तपशील काळजीपूर्वक नमूद करावा. हा तपशील आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅनकार्ड किंवा निर्धारित केलेल्या शासकीय कागदपत्रातील तपशिलानुसार असणे आवश्यक आहे. तसेच, लसीकरणाच्या वेळी कागदपत्रे नागरिकांनी आठवणीने सोबत न्यावीत. ४५ ते ६० वर्षे वयोगटातील सह-व्याधी असलेल्या नागरिकांनी नोंदणीकृत डॉक्टरांकडून प्रमाणित केलेले प्रमाणपत्र लसीकरण केंद्रात दाखविणे आवश्यक आहे. तर, ६० वर्षांवरील नागरिकांनी वयाबाबतचा योग्य पुरावा (कार्यालयीन, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र इ.) सादर करणे आवश्यक असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.