ETV Bharat / city

संपात सहभागी झालेल्या 376 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; तर आज 247 आगार बंद! - etv bharat marathi

एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरू असलेला संप आता चांगलाच चिघळला आहे. न्यायालयाचे निर्देश असतानाही कर्मचारी संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. राज्यातील 45 एसटी आगारातील 376 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.

एसटी कर्मचारी संप
एसटी कर्मचारी संप
author img

By

Published : Nov 9, 2021, 7:25 PM IST

Updated : Nov 9, 2021, 8:37 PM IST

मुंबई - एसटी महामंडळाचा विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरू असलेला संपाचा आज 12 वा दिवस आहे. राज्यातील 250 आगारांपैकी 247 आगार बंद राहिले होते. परिणामी संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांनवर एसटी महामंडळाकडून कठोर कारवाई सुरू झाली आहे. आज दिवसभरात 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरू असलेला संप आता चांगलाच चिघळला आहे. न्यायालयाचे निर्देश असतानाही कर्मचारी संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. राज्यातील 45 एसटी आगारातील 376 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.

हेही वाचा-ST workers strike : एसटी कामगारांनी संप मागे घ्यावा अन्यथा ताब्यात घेण्याचे निर्देश देऊ - उच्च न्यायालय

या आगारातील एसटी कर्मचारी निलंबित

कळवण आगारातील 17, वर्धा, हिंगणघाट आगारातील 40, अहेरी, ब्रह्मपुरी, गडचिरोली आगारातील 14, चंद्रपूर, राजुरा, विकाशा आगारातील 14, औसा, उदगीर, निलंगा, अहमदपूर, लातूर आगारातील 31, किनवट, भोकर, माहूर, कंधार, नांदेड, हादगांव, मुखेड, बिलोली, देगलूर आगारातील 58, तुमसर, तिरोडा, गोंदिया आगारातील 30, अक्कलकोट आगारातील 2, पांढरकवडा, राळेगावं, यवतमाळ आगारातील 57,औरंगाबाद आगारातील 5, हिंगोल, गंगाखेड आगारातील 10, जाफराबाद, अंबड आगारातील 16, गणेशपेठ, घाट रोड, इमामवाडा, वर्धमाननगर आगारातील 18, धुळे आगारातील 2, जत, पलूस, इस्मामपूर, आटपाडी सागरातील 58 असे राज्यभरातील 376 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा-एसटीचे विलिनीकरण होईपर्यंत संप सुरूच राहणार; एसटी कर्मचारी संघटना आक्रमक

247 आगार बंद -

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ताची मागणी मान्य झाल्याने कृती समितीने 28 ऑक्टोबर रात्रीपासून उपाेषण मागे घेतले. परंतु विलीनीकरणाच्या मुद्यावर कर्मचाऱ्यांंनी संप सुरुच ठेवला आहे. कृती समितील 23 कामगार संघटनांनी विलीनीकरणाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. तरी 22 संघटना संपात सहभागी झाल्या नाहीत. संघर्ष एसटी कामगार संघटना आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटना यांनी 3 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून संप पुकारण्याची नोटीस दिली. संपामुळे दिवाळीच्या सुट्टीत महामंडळाच्या सेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने या नोटिसीविरोधात उच्च न्यायालयात बुधावरी आव्हान दिले होते. या याचिकेवर गुरुवारी रात्री सुनावणी झाली असता संघटनांनी संप मागे घेण्याचे निर्देश न्यायालयाने कामगार संघटनाला दिले आहे. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा आदेशाला केराची टोपली दाखवत संप सुरुच ठेवला आहे. या संपाला आज 12 दिवसपूर्ण झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी स्वतःहून राज्यातील 250 आगारांपैकी 247 आगार बंद ठेवत संपाला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय सुरू आहे.

हेही वाचा-...तर एसटी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणार

आज फक्त तीन आगार सुरू-

एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने संप चिघळला आहे. राज्यातील 99.99 टक्के डेपो बंद पडले आहे. शनिवारी एसटीचे तब्बल 65 डेपाे, रविवारी 127 डेपो, सोमवारी 240 डेपो बंद राहिले आहेत. तर आज राज्यातील 250 एसटी डेपोपैकी 247 डेपो बंद ठेवले होते. एसटी महामंडळाचा कोल्हापूर विभागातील गारगोटी, कागल डेपो आणि नाशिक विभागातील इगतपुरी डेपो असे तीनच डेपो सुरु होते. दिवाळी सण साजरा करून शहराकडे येणाऱ्या नागरिकांची या संपामुळे प्रचंड हाल झाले आहेत.

हेही वाचा-कोल्हापुरातील एसटी वाहतूक सलग दुसऱ्या दिवशीही ठप्प, कर्मचारी म्हणाले...

खासगी वाहतूकदांराकडून प्रवाशांची लूट -

मुंबईतून पुणे- सातारा कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांचा एसटी संपामुळे पुरता खोळंबा झालेला आहे. एरवी साध्या लालपरीचे अवघ्या 250 रुपयांत मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज खाजगी बससाठी 400 ते 500 रुपये मोजावे लागत आहे याउलट 500 रुपयात मुंबईतून साताराकडे जाणाऱ्या प्रवाशांकडून आज 700 ते 750 रुपये भाडे आकारात असल्याचे चित्र आहे. मुंबईकडे सुटणाऱ्या हिरकणी एसटी बंद असल्याने इतर गाड्यांमधील गर्दी वाढली आहे. खासगी वाहतुकदारांकडून वाट्टेल तेवढे दर आकारले जात आहेत.

संपामुळे प्रत्येक दिवशी तब्बल १३ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच एसटी महामंडळाचा संचित तोटाही साडेबारा हजार कोटीचा घरात गेला आहे.

कोरोना काळात ७ हजार ९५१ कोटी रुपयांचा तोटा -

कोरोनापूर्वी एसटी महामंडळाचा 4 हजार 549 कोटी रुपयांचा तोटा होता. मात्र, एसटीला कोरोना काळात तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या हक्काच्या 3 हजार 800 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एसटीचा प्रचंड तोटा वाढलेला आहे. आज कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात एसटीला जवळ जवळ ७ हजार ९५१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाचा संचित तोट्याचा आकडा हा साडे बारा हजार कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचलेला आहे.

संपामुळे दररोज १३ कोटीचा महसुलावर पाणी-

कोरोनामुळे एसटी महामंडळाचे अगोदरच कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. संपामुळे प्रत्येक दिवशी तब्बल १३ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच एसटी महामंडळाचा संचित तोटाही साडेबारा हजार कोटीचा घरात गेला आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेल्याने सरासरी १०० कोटी रुपयांचा फटका एसटी महामंडळाला बसला. एसटी महामंडळाला संपामुळे दररोज सरासरी १३ कोटी रुपयांचा महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्तएसटी महामंडळाला दर वर्षी प्रवासी उत्पन्न व इतर उत्पन्नाचे स्त्रोत धरून फक्त 7 हजार 800 कोटी इतके उत्पन्न मिळते. तर एसटी महमंडळाच्या 1 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनावर वर्षाला 3 हजार 500 कोटी रुपये खर्च होतो. तर साधारणतः इंधनावर 3 हजार कोटी आणि स्पेअर पार्ट आणि टायरला साधारण 600 कोटी इतका खर्च येतो. गेल्या काही वर्षांपासून एसटीच्या प्रवासी संख्येत घट होत असल्याने एसटीचा संचित तोटा वाढत आहे. एसटी महामंडळाचा संचित तोटा हा 2014 -15 आर्थिक वर्षात 1 हजार 685 कोटी रुपये होता. 2018-19 आर्थिक वर्षांत 4 हजार 549 कोटींवर पोहोचला होता. 2020-21 या आर्थिक वर्षांत कोरोनामुळे हा तोटा १२ हजार कोटींच्या घरात जाऊन पोहोचला आहे.

कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा-

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात न्यायालयाच्या आदेशानुसार तोडगा काढत आहोत. तरीही कोणी आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे संकेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना दिले होते.

Last Updated : Nov 9, 2021, 8:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.