ETV Bharat / city

'वर्षातील ३६५ दिवस महिलांचा सन्मान केला पाहिजे'

author img

By

Published : Mar 8, 2021, 9:46 AM IST

बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील" त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी ३६५ दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे.

'वर्षातील ३६५ दिवस महिलांचा सन्मान केला पाहिजे'
'वर्षातील ३६५ दिवस महिलांचा सन्मान केला पाहिजे'

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महिला दिन हा वर्षातून एकदाच साजरा न करता वर्षातील 365 दिवस महिलांचा सन्मान केला पाहिजे असे मत राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमधून मांडले आहे.

राज ठाकरेंचे पत्र
राज ठाकरेंचे पत्र

काय म्हटले आहे राज ठाकरेंच्या पोस्टमध्ये?
८ मार्च, आज जागतिक महिला दिन. मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही.
आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, "बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील" त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी ३६५ दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे. असो.
मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो; तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही.
राजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही, तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा, तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता.

हेही वाचा - महिला दिनानिमित्त विशेष चर्चा : जाणून घ्या काय आहे PoSH कायदा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.