ETV Bharat / city

मुंबईत गेल्या महिनाभरात ३,५१६ मुलांना कोरोना, एकाही मुलाचा कोविडने मृत्यू नाही - मुंबई कोरोना रुग्णसंख्या

मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला असतानाच डिसेंबर महिन्यापासून पुन्हा रुग्ण वाढ झाली आहे. दिवसाला सुमारे ८ हजार रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्यास लहान मुलांना त्यात मोठ्या प्रमाणात बाधा होण्याची शक्यता (Corona positive children in mumbai ) वर्तवण्यात आली होती. गेल्या महिनाभरातील आकडेवारी पाहिल्यास १९ वर्षाखालील ३५१६ मुलांना (Corona positive children in mumbai ) कोरोनाचा संसर्ग झाला. या सर्व लहान मुलांनी कोरोनावर मात केली असल्याने महिनाभरात एकाही लहान मुलाचा मृत्यू झालेला नाही.

mumbai corona update
mumbai corona update
author img

By

Published : Jan 4, 2022, 7:16 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला असतानाच डिसेंबर महिन्यापासून पुन्हा रुग्ण वाढ झाली आहे. दिवसाला सुमारे ८ हजार रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्यास लहान मुलांना त्यात मोठ्या प्रमाणात बाधा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. गेल्या महिनाभरातील आकडेवारी पाहिल्यास १९ वर्षाखालील ३५१६ मुलांना कोरोनाचा संसर्ग (Corona positive children in mumbai ) झाला. या सर्व लहान मुलांनी कोरोनावर मात केली असल्याने महिनाभरात एकाही लहान मुलाचा मृत्यू झालेला नाही.

महिनाभरात १९ वर्षाखालील ३५१६ मुलांना कोरोना -

मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला. तेव्हापासून ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत ० ते ९ वयोगटातील १४ हजार ३८१ लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊन १९ मुलांचा मृत्यू झाला. तर १० ते १९ वयोगटातील ३७ हजार ५४ मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊन ४२ मुलांचा मृत्यू झाला. ३० नोव्हेंबरपर्यंत १९ वर्षाखालील एकूण ६१ मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. २ जानेवारीपर्यंत ० ते ९ वयोगटातील १५ हजार ९६ लहान मुलांना तर १० ते १९ वयोगटातील ३९ हजार ८५५ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला. गेल्या पावणे दोन वर्षात ३० नोव्हेंबरपर्यंत ५१ हजार ४३५ मुलांना तर २ जानेवारीपर्यंत ५४ हजार ९५१ लहान मुलांना कोरोनाची लागण झाली. गेल्या महिनाभरात १९ वर्षाखालील तब्बल ३५१६ मुलांना (Corona positive children in mumbai ) कोरोनाचा संसर्ग झाला.

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी
महिनाभरात एकाही लहान मुलाचा मृत्यू नाही -

३० नोव्हेंबरला एकूण १६ हजार ३३६ मृत्यू झाले होते. आता (२ जानेवारी) पर्यंत एकूण १६ हजार ३७७ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत महिनाभरात केवळ ४१ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यात लहान मुलांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. २ जानेवारीपर्यंत ० ते ९ वयोगटातीला १९ तर १० ते १९ वयोगटातील ४२ अशा ६१ मुलांचा मृत्यू झाला आहे. ३० नोव्हेंबर रोजी मुंबईमधील मृत्यू दर २.१४ टक्के इतका होता. मृत्यूंची संख्या कमी झाल्याने मृत्युदर घसरून २ जानेवारी रोजी तो २.०५ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

सक्रिय रुग्ण वाढले -
३० नोव्हेंबरला २०५२ अॅक्टिव्ह रुग्ण होते, त्यात ११२८ लक्षणे नसलेले, ७५१ लक्षणे असलेले तर १७३ क्रिटिकल रुग्ण होते. २ जानेवारीला २९ हजार ८१९ ऍक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात लक्षणे नसलेले ३६ हजार ५३८, लक्षणे असलेले ३०४६ तर २३५ क्रिटिकल रुग्ण आहेत. गेल्या महिनाभरात २७ हजार ७६७ अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात लक्षणे नसलेले ३५ हजार ४१०, २ हजार २९५ लक्षणे असलेले रुग्ण वाढले आहेत तर ६२ क्रिटिकल रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

महिनाभरात ३६,६३९ रुग्णांची नोंद -

मुंबईत कोरोनाच्या दोन लाटा आल्या आहेत. या दोन्ही लाटा थोपवल्यावर डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना आटोक्यात असताना ३० नोव्हेंबरपर्यंत मुंबईत एकूण ७ लाख ६२ हजार ८८१ रुग्णांची नोंद झाली. महिनाभरानंतर २ जानेवारीला एकूण ७ लाख ९९ हजार ५२० रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात मुंबईत कोरोनाच्या ३६ हजार ६३९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

पालिका सज्ज -

सध्या मुंबईमध्ये इतर ठिकाणच्या तुलनेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी आहे. लहान मुलांची संख्या वाढल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करता यावेत यासाठी लागणाऱ्या खाटा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन खाटा आदी उपकरणे औषधें तयार ठेवली आहेत अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.