मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान आज सेव्हन हिल हॉस्पिटल, बिकेसी कोविड सेंटर आदी ठिकाणी गोंधळ उडाला. या गोंधळातही आज 33 हजार 807 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 25 लाख 20 हजार 634 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत आज बुधवारी 33 हजार 807 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 7 हजार 1 लाभार्थ्यांना पहिला तर 26 हजार 806 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 25 लाख 20 हजार 634 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 19 लाख 80 हजार 634 लाभार्थ्यांना पहिला तर 5 लाख 40 हजार लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 85 हजार 938 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 31 हजार 158 फ्रंटलाईन वर्कर, 10 लाख 10 हजार 988 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार व इतर 8 लाख 82 हजार 083 तर 18 ते 44 वर्षामधील 10 हजार 467 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरणादरम्यान गोंधळ -
मुंबईत लसीकरणाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यासाठी कोविन ऍपवर नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस दिली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच दरम्यान दुसरा डोस असलेल्या नागरिकांना लसीसाठी वेगळी रांग लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही आपली नोंदणी नसलेले 18 ते 44 वयोगटातील नागरिक तसेच 45 वर्षावरील नागरिक मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रांवर लसीकरणासाठी आल्याने सेव्हन हिल हॉस्पिटल तसेच बिकेसी कोविड सेंटर येथे काही काळ गोंधळ उडाला होता. मात्र त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर गर्दी कमी होऊन लसीकरण करण्यात आले.
लसीकरण मोहीम -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. आज 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे.
एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 2,85,938
फ्रंटलाईन वर्कर - 3,31,158
जेष्ठ नागरिक - 10,10,988
45 ते 59 वय - 8,82,083
18 तर 44 वय - 10,467
एकूण - 25,20,634
हेही वाचा - कोरोना आरटीपीसीआर स्वॅब स्टिकच्या हजारो किटचे पॅकिंग घरातच, व्हिडिओ व्हायरल