मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. रविवारी 31 ऑक्टोबरला 1172 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 20 मृत्यूंची नोंद झाली असून 1399 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.57 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
16,658 सक्रिय रुग्ण -
राज्यात आज 1172 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 11 हजार 078 वर पोहचला आहे. तर आज 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 216 वर पोहचला आहे. आज 1399 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 50 हजार 585 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.57 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 26 लाख 67 हजार 211 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.55 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 65 हजार 826 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 16 हजार 658 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
रुग्ण, मृत्यूसंख्येत घट -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 25 ऑक्टोबरला 889, 26 ऑक्टोबरला 1201, 27 ऑक्टोबरला 1485, 28 ऑक्टोबरला 1418, 29 ऑक्टोबरला 1338, 30 ऑक्टोबरला 1130, 31 ऑक्टोबरला 1172 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26, 31 ऑक्टोबरला 20 मृत्यूंची नोंद झाली आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
- मुंबई महापालिका - 308
- अहमदनगर - 131
- पुणे - 128
- पुणे पालिका - 69
हेही वाचा - उर्मिला मातोंडकर कोरोना पॉझीटीव्ह; काळजी घेण्याचे केले आवाहन