ETV Bharat / city

जिल्हा वार्षिक योजनेत महिला व बालकल्याणासाठी राखीव ठेवण्यात येणार 3 टक्के निधी - women and child welfare fund

महिला व बाल कल्याणाकरिता जिल्हा स्तरावर सध्या कार्यान्वित असलेल्या योजना अल्प प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यामध्ये भरीव वाढ होणे आवश्यक आहे. जिल्हा वार्षिक योजना 2021-22चे वार्षिक आराखडे तयार करताना विविध घटकांसाठीच्या योजनांसाठी निधीचे प्रमाण किती असावे, याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या.

यशोमती ठाकुर
यशोमती ठाकुर
author img

By

Published : Feb 25, 2021, 7:24 PM IST

मुंबई - आगामी आर्थिक वर्षापासून जिल्हा वार्षिक योजनेत महिला व बालकल्याणाकरिता 3 टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांनी याबाबत आग्रह धरला होता.

चिन्हांकित निधीबाबतही सूचना

महिला व बाल कल्याणाकरिता जिल्हा स्तरावर सध्या कार्यान्वित असलेल्या योजना अल्प प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यामध्ये भरीव वाढ होणे आवश्यक आहे. जिल्हा वार्षिक योजना 2021-22चे वार्षिक आराखडे तयार करताना विविध घटकांसाठीच्या योजनांसाठी निधीचे प्रमाण किती असावे, याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महिला व बाल कल्याणाकरिता चिन्हांकित निधीबाबतही (इव्हॅल्युएटेड फन्ड्स फॉर वुमन ॲण्ड चाइल्ड वेल्फेअर) सूचनांचा समावेश आहे.

राबविण्यात येणार जिल्हास्तरीय योजना

महिला व बाल कल्याणाकरिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22पासून महिला व बाल कल्याणाकरिता काही अतिरिक्त जिल्हास्तरीय योजना राबविण्यात येणार आहेत. त्याकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22मध्ये महिला व बाल कल्याणाकरिता 3 टक्के निधी राखीव म्हणून उपलब्ध करावयाचा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.