मुंबई - कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना 15 ऑगस्टपासून उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आले आहे. त्यानुसार, लसीच्या दाेन मात्रा घेतलेल्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करून रेल्वेचा पास देण्यात येत आहे. गेल्या 14 दिवसात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण 3 लाख 64 हजार 522 लसवंतांना पासची विक्री झाली आहे. त्यामुळे आता लसवंतांनी लोकल प्रवास सुरू केला आहे.
लसवंतांना तुफान प्रतिसाद
कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आले आहे. त्यानुसार,नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणे सोयीचे व्हावे, त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा, यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाइन पडताळणी प्रक्रिया ११ ऑगस्टपासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ५३ रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) १०९ स्थानकांवर मदत कक्ष सुरू करण्यात आले आहे. या मदत कक्षांवर प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर त्यावर आणि छायाचित्र ओळखपत्र पुराव्यावर शिक्का मारून ते पुन्हा नागरिकांना देण्यात येतात. त्यानंतर रेल्वेचा पास काढला जातो. मध्य रेल्वेवर ११ ऑगस्ट ते २४ ऑगस्टपर्यंत २ लाख ५८ हजार १८२ पास तर पश्चिम रेल्वेवर १ लाख ६ हजार ३४० पास काढले आहेत. विशेष म्हणजे लसवंतांना पास मिळावा, यासाठी मध्य रेल्वेवर ३४१ आणि पश्चिम रेल्वेवर २७६ अशा ६१७ तिकीट खिडक्या उगडण्यात आलेल्या आहे.
दररोज धावतात 'इतक्या' लोकल फेऱ्या
राज्य सरकारच्या सूचनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकल पूर्ण क्षमतेने चालविण्यास 16 ऑगस्टपासूनच सुरूवात केली. मध्य रेल्वेवर कोरोनापूर्वी एकूण 1 हजार 774 लोकल फेऱ्या धावत होत्या. तर, 14 ऑगस्टपर्यंत 1 हजार 612 फेऱ्या धावत होत्या. मात्र, सोमवारपासून 74 फेऱ्या वाढवून 1 हजार 686 फेऱ्या धावण्यास सुरूवात झाली.
पश्चिम रेल्वे पास विक्री
11 ऑगस्ट | 11,664 |
12 ऑगस्ट | 10,430 |
13 ऑगस्ट | 7,873 |
14 ऑगस्ट | 7,121 |
15 ऑगस्ट | 7,399 |
16 ऑगस्ट | 11,876 |
17 ऑगस्ट | 9, 566 |
18 ऑगस्ट | 6,313 |
19 ऑगस्ट | 5,462 |
20 ऑगस्ट | 5,774 |
21 ऑगस्ट | 5,294 |
22 ऑगस्ट | 3,941 |
23 ऑगस्ट | 7,346 |
23 ऑगस्ट | 7,346 |
एकूण | 1 लाख 06 हजार 340 |
मध्य रेल्वेची पास विक्री
11 ऑगस्ट | 22,689 |
12 ऑगस्ट | 22,104 |
13 ऑगस्ट | 17,765 |
14 ऑगस्ट | 16,439 |
15 ऑगस्ट | 13,327 |
16 ऑगस्ट | 27,124 |
17 ऑगस्ट | 24,013 |
18 ऑगस्ट | 16,341 |
19 ऑगस्ट | 15314 |
20 ऑगस्ट | 17024 |
21 ऑगस्ट | 12,919 |
22 ऑगस्ट | 8,556 |
23 ऑगस्ट | 25,872 |
24 ऑगस्ट | 18,695 |
एकूण | 2 लाख 58 हजार 182 |