मुंबई यंदा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात (Ganeshotsav in Maharashtra) साजरा होत आहे. अशातच मुंबईतला (Mumbai Ganesh Festival) रेडलाईट एरिया कामाठीपुरातील (Chintamani Ganesh from Kamathipura) २८ फुटी चिंतामणी बाप्पा भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरतोय. कामाठीपुराच्या १४ व्या गल्लीत हा बाप्पा विराजमान झाला आहे. रेडलाईट एरियामधील हि सर्वात उंच मूर्ती आहे. यंदा कमळावर एका पायावर विराजमान झालेली गणपती बाप्पाची मनमोहक मूर्ती इथे स्थापन करण्यात आली आहे.
उंच मूर्ती बसवण्यावर विशेष भर (Tall Ganesha idol) सिद्धिविनायक मित्र मंडळाने (Siddhivinayak Mitra Mandal) या गणपती बाप्पाचं आयोजन केलं आहे. इथे असणाऱ्या घराघरातून वर्गणी काढून गणपती बाप्पाची आराधना केली जाते. येथील महिला सुद्धा या गणपतीची भक्तीभावाने पूजाअर्चा करतात. गणपती बाप्पाच्या दहा दिवसांमध्ये इथल्या प्रत्येक गल्लीत भक्तगण गणेश भक्तीच्या वातावरणात तल्लीन झालेले बघायला भेटतात. येथील स्थानिक महिला गणपती बाप्पाची वर्षभर वाट बघत असतात.
या विभागात महिलांवर असतात बंधन ? रेड लाईट एरिया मध्ये असणाऱ्या महिलांवर अनेक प्रकारची बंधन असतात. त्या स्वतःच्या मर्जीने कुठेही जाऊ शकत नाहीत. त्याचबरोबर हा एरिया त्यांच्यासाठी सर्व काही असतो. अशात गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे त्यांच्यासाठी घरी आलेला एक पाहुणाचं असतो, व या पाहुण्याचं मनोभावे स्वागत करण्यासाठी त्या गणेश भक्तीत मग्न होतात. बाप्पाच्या पूजेपासून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी सुद्धा त्या पुढाकार घेतात. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी व त्याचबरोबर अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला देण्यासाठी निरोप देण्यासाठी या महिला बाप्पाच्या भव्य मिरवणुकीत सहभागी होत गिरगाव चौपाटीपर्यंत सुद्धा जातात. परंतु बाप्पाला निरोप दिल्यानंतर या वर्षभर आतुरतेने पुन्हा अनंत चतुर्थीच्या ( Anant Chaturthi) दिवसाची वाट बघत असतात. कारण सुखकर्ता दुःखहर्ता गणपती बाप्पा हाच यांच्यासाठी सर्वकाही झाला आहे.