ETV Bharat / city

26/11 Mumbai Attack : हल्ल्यात गोळी लागलेले ईटीव्हीचे कॅमेरामन अनिल निर्मळ यांच्याकडून ऐका त्या दिवशीची थरारकथा!

author img

By

Published : Nov 26, 2021, 6:06 AM IST

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर(26/11 Mumbai Terrorist Attack) झालेल्या अतिरेकी हल्ल्यादरम्यान ईटीव्हीचे कॅमेरामन अनिल निर्मळ(ETV cameraman Anil Nirmal) यांच्या हाताला गोळी लागली होती. मला तो दिवसही अजून आठवतो. तो दिवस मी कधीही विसरू शकणार नाही अशी आठवण अनिल निर्मळ यांनी सांगितली आहे. 26/11 हल्ल्याला तेरा वर्षे पूर्ण होत असताना अनिल निर्मळ यांच्याकडूनच ऐका, त्या दिवशीची थरारकथा...

26/11 Mumbai Attack : हल्ल्यात गोळी लागलेले ईटीव्हीचे कॅमेरामन अनिल निर्मळ यांच्याकडून ऐका त्या दिवशीची थरारकथा!
26/11 Mumbai Attack : हल्ल्यात गोळी लागलेले ईटीव्हीचे कॅमेरामन अनिल निर्मळ यांच्याकडून ऐका त्या दिवशीची थरारकथा!

मुंबई : 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर(26/11 Mumbai Terrorist Attack) झालेल्या अतिरेकी हल्ल्यादरम्यान ईटीव्हीचे कॅमेरामन अनिल निर्मळ(ETV cameraman Anil Nirmal) यांच्या हाताला गोळी लागली होती. मला तो दिवसही अजून आठवतो. तो दिवस मी कधीही विसरू शकणार नाही अशी आठवण अनिल निर्मळ यांनी सांगितली आहे. 26/11 हल्ल्याला तेरा वर्षे पूर्ण होत असताना अनिल निर्मळ यांच्याकडूनच ऐका, त्या दिवशीची थरारकथा...

13 वर्षांपूर्वीच्या त्या रात्री दहा हल्लेखोर समुद्रमार्गे मुंबईत घुसले. दोन पंचतारांकित हॉटेल, एक गजबजलेले कॅफे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(CSMT) आणि नरिमन हाऊस या ठिकाणी त्यांनी हल्ला केला. त्यानंतर साठ तास चाललेल्या चकमकीत 174 जणांना प्राण गमवावे लागले होते. सगळं जगच त्या हल्ल्यानं हादरून गेलं होतं.

अनिल निर्मळ हे ई टीव्ही करिता कॅमेरामन म्हणून काम करत होते. ईटीव्हीला अनेक वर्षे पुण्यामध्ये कॅमेरामन म्हणून काम केल्यानंतर त्यांना मुंबई कॅमेरामन म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे ते मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर अनिल निर्मळ हे त्यांच्या मित्रांसोबत पेईंग गेस्ट म्हणून मुंबईत राहत होते. त्यांचे आई वडील पुण्याला राहत होते.

26/11 च्या रात्री नेहमीप्रमाणे काम संपल्यानंतर अनिल आपल्या रूमवर पोहोचले होते. मात्र काही वेळातच ऑफिसमधून त्यांना फोन आला. त्यांना पण माहिती मिळाली होती सीएसएमटीवर हल्ला झाला आहे. फोनवरून अनिल यांना ऑफिसला येण्यास सांगण्यात आले. त्यानंतर अनिल निर्मळ ऑफिसला जाण्यासाठी निघाले. ऑफिसला पोहोचल्यावर ते आपला कॅमेरा घेऊन सीएसएमटीजवळील मेट्रो सिनेमाजवळ पोहोचले. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरिकेट्स लावण्यात आले होते.

काही वेळात तिथून एक पोलिसांची व्हॅन आली आणि किती वेळ थांबल्यानंतर त्यातून गोळीबार सुरू झाला. त्यातील एक गोळी अनिल यांच्या हाताच्या बोटांना चाटून गेली. अनिल यांना काय झाले हे कळायच्या आतच त्यांच्या हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला होता. त्यानंतर अनिल यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार झाले. या मोठ्या धक्क्यातून सावरल्यानंतर अनिल आजही माध्यमांत काम करत आहेत. मात्र आजही त्यांच्या मनात त्या घटनेच्या आठवणी ताज्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.