ETV Bharat / city

Mumbai Water Supply: मुंबईकरांच्या २४ तास पाण्याचे नेमके झाले काय? मुंबईकरांचे स्वप्न अधुरेच.. - शिवसेनेचा वचननामा फसवा

Mumbai Water Supply: मुंबईमधील सुमारे दीड कोटी नागरिकांना २४ तास पाणी मिळेल अशी स्वप्न दाखवण्यात आली होती. महापालिकेकडून २ विभाग कार्यालयाच्या हद्दीत प्रायोगिक तत्वावर तसा प्रयोग करण्यात आला. मात्र २४ तास पाण्यासाठी पाणीसाठा अपुरा असल्याने मुंबईकरांचे हे स्वप्नच राहिले आहे. पुढील आणखी काही वर्षे महापालिकेकडून Mumbai Municipal Corporation नवीन प्रकल्प हाती घेतेले जातील, याची शक्यता नसल्याने मुंबईकरांचे २४ तास पाण्याचे स्वप्न अपुरेच राहणार आहे.

Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal Corporation
author img

By

Published : Sep 29, 2022, 10:44 PM IST

मुंबई: Mumbai Water Supply: मुंबईमधील सुमारे दीड कोटी नागरिकांना २४ तास पाणी मिळेल अशी स्वप्न दाखवण्यात आली होती. महापालिकेकडून २ विभाग कार्यालयाच्या हद्दीत प्रायोगिक तत्वावर तसा प्रयोग करण्यात आला. मात्र २४ तास पाण्यासाठी पाणीसाठा अपुरा असल्याने मुंबईकरांचे हे स्वप्नच राहिले आहे. पुढील आणखी काही वर्षे महापालिकेकडून Mumbai Municipal Corporation नवीन प्रकल्प हाती घेतेले जातील, याची शक्यता नसल्याने मुंबईकरांचे २४ तास पाण्याचे स्वप्न अपुरेच राहणार आहे.

२४ तास पाण्याचा प्रयोग अयशस्वी मुंबईमध्ये १ कोटी ३० लाख नागरिक राहतात. मुंबई बाहेरून कामानिमित्त लाखो लोक येतात. या सर्वांची तहान भागवण्याचे काम मुंबई महापालिकेकडून केले जाते. पालिकेकडून दिवसाला ३८५० दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा भातसा, मोडक सागर, तानसा, वैतरणा, मध्य वैतरणा, तुळसी, विहार आदी धरणांमधून केला जातो. नागरिकांना पुरेल इतका हा पाणीसाठा जेमतेम आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईकर नागरिकांना २४ तास पाणी देऊ असे आश्वासन पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने दिले होते. त्यासाठी पालिकेच्या २४ विभागापैकी वांद्रे येथील एच वेस्ट आणि मुलुंड येथील टी विभागाची निवड करण्यात आली. मात्र या दोन्ही विभागात हा प्रयोग यशस्वी झालेला नाही.

मुंबईकरांच्या २४ तास पाण्याचे नेमके झाले काय

इतके लागते रोज पाणी मुंबईमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी ३८५० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा लागतो. हा पाणीसाठा भातसा, मोडक सागर, तानसा, वैतरणा, मध्य वैतरणा, तुळसी, विहार आदी धरणांमधून केला जातो. तानसा ( ४५५ द.ल.लि. प्रतिदिन ), मोडक सागर ( वैतरणा ) ( ४५५ द.ल.लि. प्रतिदिन ), हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा ( ४५५ द.ल.लि. प्रतिदिन ), अप्पर वैतरणा ( ६४० द.ल.लि. प्रतिदिन ) भातसा ( २०२० द.ल.लि. प्रतिदिन ), विहार (९० द.ल.लि. प्रतिदिन) आणि तुळशी (१८ द.ल.लि. प्रतिदिन) पाणीपुरवठा केला जातो.

२४ तास पाणी अशक्य मुंबईला मोडक सागर, तानसा, वैतरणा, भातसा, तुळसी, विहार आदी धरणांमधून दिवसाला ३८५० दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जातो. हा पाणी पुरवठा सध्याच्या लोकसंख्येला जेमतेम पुरेल इतका आहे. पाणी पुरवठा कमी होणे, कमी दाबाने पाणी येणे यासारख्या तक्रारी मुंबईकरांच्या नेहमीच असतात. भविष्यात पालिकेला ४ ते ५ हजार दशलक्ष लिटर पाणी रोज लागणार आहे. त्यासाठी गारगाई, पिंजाळ, दमणगंगा हे प्रकल्प प्रस्तावित आहेत. गरज भासेल त्यानुसार ही धरणे बांधली जाणार आहेत. या तीन धरणांमधून सुमारे २८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. सध्या पालिकेने २०० दशलक्ष क्षमतेचा मानोरी येथे समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी रोजच्या पाणीसाठ्यात वाढ करावी लागेल. त्यासाठी नव्या धरणांची आवश्यकता आहे. सध्या तरी नवीन प्रकल्प हाती घेतले नसल्याने २४ तास पाणीपुरवठा शक्य नसल्याचे पालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम मालावडे यांनी सांगितले आहे.

शिवसेनेचा वचननामा फसवा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी सत्ताधारी शिवसेनेने २४ बाय ७ पाणी देऊ असे आश्वासन दिले होते. गेल्या साडेपाच ते सहा वर्षात हे वचन पूर्ण झालेलं नाही. याचाच अर्थ शिवसेनेचा वचननामा फसवा आहे. गारगाई आणि पिंजाळ या प्रकल्पासाठी गेले काही वर्षे पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जात होती. यंदाच्या अर्थसंकल्पात अशी तरतूद करण्यात आलेली नाही. हे प्रकल्प बासनात का गुंडाळले याचे उत्तर शिवसेनेने द्यावे. जे व्यवहार्य प्रकल्प आहेत ते प्रकल्प बासनात गुंडाळायचे आणि जे मलिदा देणारे खर्चिक प्रकल्प आहेत ते आणायचे इतकेच शिवसेनेने केले आहे, असा आरोप भाजपचे पालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.