ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : राज्यात आज 3 हजार 900 तर, मुंबईत 2 हजार 510 नव्या कोरोना रुग्णांची नोंद - मुंबई कोरोना अपडेट

राज्यात आज 3 हजार 900 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 306 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकवरी रेट हा 97.61 टक्के इतका आहे. त्याचबरोबर, राज्यात आज 85 नव्या ऑमायक्रॉन रग्णांची नोंद झाली आहे. तसेच, आज मुंबईत (29 डिसेंबरला) 2 हजार 510 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

2 thousand 510 new corona patients found in mumbai

author img

By

Published : Dec 29, 2021, 10:20 PM IST

Updated : Dec 30, 2021, 12:33 PM IST

मुंबई - राज्यात आज 3 हजार 900 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 306 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकवरी रेट हा 97.61 टक्के इतका आहे. त्याचबरोबर, राज्यात आज 85 नव्या ऑमायक्रॉन रग्णांची नोंद झाली आहे. तसेच, आज मुंबईत (29 डिसेंबरला) 2 हजार 510 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा - Dharavi Covid Cases Increased : धारावीत पुन्हा कोरोना रुग्ण वाढले.. दिवसभरात १७ रुग्णांची नोंद

मुंबईमध्ये गेल्या दोन वर्षांत कोरोना विषाणूच्या दोन लाटा आल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. मात्र, डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला 108 रुग्ण आढळून आले होते. त्यात गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. काल रुग्णसंख्या एक हजारच्या वर गेली होती. आज त्यात वाढ होऊन रुग्णसंख्या दोन हजारच्या पार गेली आहे. आज (29 डिसेंबरला) 2 हजार 510 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

आज 2 हजार 510 नवे रुग्ण -

आज 29 डिसेंबरला 2 हजार 510 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, एका मृत्यूची नोंद झाली आहे. आज 251 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 75 हजार 808 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 48 हजार 788 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 16 हजार 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 8 हजार 60 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के ( corona patient recovery rate in Mumbai ) तर रुग्ण दुपटीचा कालावधी 682 दिवस इतका आहे. मुंबईमधील 45 इमारती आणि एक झोपडपट्टी सील करण्यात आली आहे. 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.10 टक्के इतका आहे.

या दिवशी रुग्णसंख्या वाढली -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. 4 डिसेंबरला 228, 8 डिसेंबरला 250, 11 डिसेंबरला 256, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबरला 295, 18 डिसेंबरला 283, 19 डिसेंबरला 336, 21 डिसेंबरला 327, 22 डिसेंबरला 490, 23 डिसेंबरला 602, 24 डिसेंबरला 683, 25 डिसेंबर 757, 26 डिसेंबर 922, 27 डिसेंबरला 809, 28 डिसेंबरला 1377, 29 डिसेंबर 2510 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

सात वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. मुंबईमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. त्याचप्रमाणे मृत्यूंची संख्या कमी करण्यात यश आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यांत 1 ते 6 मृत्यूंची नोंद झाली होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला दुसऱ्यांदा, 15 डिसेंबरला तिसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर 18 डिसेंबरला चौथ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. 20 डिसेंबरला पाचव्यांदा 22 डिसेंबरला सहाव्यांदा तर, 25 डिसेंबरला सातव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूची संख्या शून्य होत (corona patient deaths in Mumbai) असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा - Pravin Darekar on Meow Sound : राज्य सरकार नियोजनबद्ध पद्धतीने राणेंवर कारवाई करतंय; प्रवीण दरेकरांचा आरोप

Last Updated : Dec 30, 2021, 12:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.