मुंबई - मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत विषाणूच्या दोन लाटा आल्या व त्या थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी दिलेली साथ यामुळे मुंबईमधील रुग्णसंख्या घटली आहे. गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या 200 च्या पार गेली होती. त्यात आज घट होऊन 192 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
आज रुग्णसंख्या 200 च्या खाली -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. 3 डिसेंबरला त्यात घट होऊन 186 रुग्णांची नोंद झाली. 4 डिसेंबरला पुन्हा वाढ होऊन 228 तर 5 डिसेंबरला 219 रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होऊन 6 डिसेंबरला 168 तर 7 डिसेंबरला 191 रुग्ण आढळून आले. काल 8 डिसेंबरला रुग्णसंख्या पुन्हा वाढून 250, 9 डिसेंबरला 218 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात घट होऊन आज 192 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
आज 192 नवे रुग्ण -
आज 10 डिसेंबरला 192 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 64 हजार 854 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 44 हजार 149 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 355 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 2603 दिवस इतका आहे. मुंबईमधील 11 इमारती सील करण्यात आल्या आहेत. 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.03 टक्के इतका आहे.