ETV Bharat / city

Special Trains Between Pune Kanpur Central: उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून पुणे व कानपूर सेंट्रल दरम्यान १८ साप्ताहिक विशेष गाड्या

अनेक ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या ( Trains For Summer Vacation ) आहेत. सुट्ट्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पुणे व कानपुर सेंट्रल या स्थानकांदरम्यान १८ विशेष साप्ताहिक गाड्या सुरु केल्या ( Special Trains Between Pune Kanpur Central ) आहेत.

उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून पुणे व कानपूर सेंट्रल दरम्यान १८ साप्ताहिक विशेष गाड्या

author img

By

Published : Apr 13, 2022, 8:28 PM IST

मुंबई - गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अनेकांनी उन्हाळयात घरीच सुट्या घालवल्या. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यात निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी आणि लग्न सराईचा सीजन असल्यामुळे बाहेर गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रेल्वेकडून गर्दीचे विभाजन करण्यासाठी ( Trains For Summer Vacation ) मध्य रेल्वेने पुणे आणि कानपूर सेंट्रल दरम्यान १८ सुपरफास्ट / एक्सप्रेस साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला ( Special Trains Between Pune Kanpur Central ) आहे.

अशा धावणार गाड्या : ट्रेन क्रमांक 01037 सुपरफास्ट साप्ताहिक विशेष १७ एप्रिल २०२२ ते १२ जून २०२२ (९ फेऱ्या) पर्यंत पुणे येथून दर रविवारी ०६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०७.४५ वाजता कानपूर सेंट्रलला पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01038 साप्ताहिक विशेष गाडी १८ एप्रिल २०२२ ते १३ जून २०२२ (९ फेऱ्या) पर्यंत दर सोमवारी कानपूर सेंट्रल येथून १२.२० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता पोहोचेल. या दोन्ही गाड्यांना दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगणा लक्ष्मीबाई जंक्शन आणि ओराई या स्थानकावर थांबे असणार आहेत.

उद्यापासून आरक्षण सुरु : ट्रेन क्रमांक 01037/ 01038 या दोन्ही सुपरफास्ट साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस गाडयांना एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी असे डब्बे असणार आहेत. विशेष ट्रेन क्रमांक 01037 साठी विशेष शुल्कासह बुकिंग १३ एप्रिल २०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

हेही वाचा : VIDEO : धावत्या रेल्वेखाली सापडले साधूबाबा, आश्चर्यकारकरित्या बचावले.. पाहा हा थरारक व्हिडिओ..

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.