ETV Bharat / city

चेंबूर चिल्ड्रन होममधील 18 मुले कोरोना पॉझिटिव्ह - top news on corona

मुंबईच्या चेंबूर येथे चिल्ड्रन होम आहे. यालाच बाल सुधारगृह म्हणूनही ओळखले जाते. या बाल सुधारगृहात एकूण 102 मुले आहेत. त्यापैकी 25 व 26 ऑगस्ट रोजी दोन मुलांची पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात चाचणी केली असता त्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी आणखी 16 मुले पॉझिटिव्ह आली आहेत. बाल सुधारगृहामधील एकूण 18 मुले सध्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

18 children corona positive in Chembur Children's Home, mumbai
चेंबूर बाल सुधारगृहातील 18 मुले कोरोना पॉझिटिव्ह
author img

By

Published : Aug 29, 2021, 10:45 PM IST

मुंबई - शहरातील चेंबूर येथील चिल्ड्रन होममधील 18 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथ आश्रमामध्ये 22 जणांना कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला होता. यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

18 मुले कोरोना पॉझिटिव्ह -

मुंबईच्या चेंबूर येथे चिल्ड्रन होम आहे. यालाच बाल सुधारगृह म्हणून ओळखले जाते. या बाल सुधारगृहात एकूण 102 मुले आहेत. त्यापैकी 25 व 26 ऑगस्ट रोजी दोन मुलांची पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात चाचणी केली असता त्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी आणखी 16 मुले पॉझिटिव्ह आले आहेत. बाल सुधारगृहामधील एकूण 18 मुले सध्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्या सर्वांना व्हिडिओकॉन अतिथी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अनाथ आश्रममधील 22 जण पॉझिटिव्ह -

मुंबईत आग्रीपाडा येथे सेंट जोसेफ अनाथ आश्रम आहे. या अनाथ आश्रममध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाकडून आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरादरम्यान आश्रमामधील काम करणारे कर्मचारी आणि मुलांची अशा एकूण 95 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामधील 22 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 12 वर्षाखालील 4 मुलांवर पालिकेच्या नायर रुग्णालयात लहान मुलांच्या वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत. तर इतर 12 वर्षावरील 11 मुलांना आणि 7 कर्मचाऱ्यांना भायखळा येथील रिचर्डसन आणि क्रूडास कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. 26 ऑगस्टला अनाथ आश्रम सील केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा - 100 कोटींची खंडणी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना क्लीनचिट ? सीबीआयकडून मोठा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.