ETV Bharat / city

ब्रिटनमधून मुंबईत आले १६८८ प्रवासी; एकही पॉझिटिव्ह नाही - News about the corona virus in Britain

मुंबईत ब्रिटनमधून १६८८ प्रवासी दाखल झाले. यातील एकही प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आलेला नाही, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

1688 migrants from Britain came to Mumbai
ब्रिटनमधून मुंबईत आले १६८८ प्रवासी - एकही पॉझिटीव्ह नाही
author img

By

Published : Dec 23, 2020, 9:54 PM IST

मुंबई - ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार उघडकीस आला आहे. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटनहून भारतात येणारी विमाने २३ डिसेंबरपासून रद्द करण्यात आली आहेत. काल आणि आज या दोन दिवसात एकूण ५ पैकी ४ विमाने ब्रिटन येथून मुंबईत आली आहेत. या चार विमानातून एकूण १६८८ प्रवासी मुंबई एअरपोर्टवर उतरले. त्यापैकी एकालाही व्हायरसची लागण झाल्याचे समोर आलेले नाही. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

क्वारंटाईन, होम क्वारंटाईन -

ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना आढळल्यानंतर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून येथील विमानांना भारतात बंदी घातली आहे. इतर देशातून येणा-या विमानांतील प्रवाशांवरही लक्ष ठेवण्याचे आदेश आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत ब्रिटनवरून मुंबईत पाच विमाने येणार होती. यातील एक विमान रद्द झाले. उर्वरित चार विमाने रात्री उशिरापर्यंत आली. या विमानातून १६८८ प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले. यातील ७४८ प्रवाशांना मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले आहे. ६०२ प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवून तेथे क्वारंटाईन केले आहे. तर दोन प्रवाशांची घरची अडचण असल्याने त्यांना त्यांच्या घरी जाणे आवश्यक होते. त्यामुळे खबरदारी घेऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. नियमानुसार ते होम क्वारंटाईन होणार आहेत. युरोप व्यतिरिक्त इतर देशातून, मिडल इस्ट येथून ३३९ प्रवासी आले. या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत.

राज्याबाहेरच्यांना त्यांच्या राज्यात क्वारंटाईन करणार -

मुंबई एअरपोर्टवर ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवाशांना क्वारंटाईन केले जात आहे. सोमवारी - मंगळवारच्या रात्री काही प्रवाशांनी आमच्याकडे पैसे नसल्याने आम्ही क्वारंटाईन होणार नाही, आम्हाला आमच्या राज्यात घरी जाऊ द्या असे सांगितले आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रवाशांना मुंबईत हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. ज्या प्रवाशांना त्यांच्या राज्यात जायचे आहे त्या राज्याच्या मुख्य सचिवांना तशा सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या राज्यात त्या प्रवाशांना क्वारंटाईन केले जाणार आहे. तो पर्यंत त्या प्रवाशांना मुंबईत निगराणीखाली ठेवण्यात आल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.