ETV Bharat / city

विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा गैरफायदा घेत लालबागमधून 160 पर्स, मोबाईलची चोरी - लालबागमधून 160 पर्स मोबाईलची चोरी

अनंत चतुर्दशीदिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी परळ, लालबाग, गिरगाव या ठिकाणी देखील भाविकांची तुफान गर्दी होते. त्याच (disadvantage of crowd during immersion procession) गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे आणि गुन्हेगार भाविकांच्या खिशावर डल्ला मारतात. काळाचौकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी 11 सोनसाखळी चोरीचे गुन्हे आणि 150 ते 160 पर्स मोबाईल तसेच कागदपत्रे (160 purses mobiles stolen from Lalbagh) गहाळ तसेच चोरी झाल्याच्या घटना दाखल आहेत.

विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेत लालबागमधून 160 पर्स, मोबाईलची चोरी

author img

By

Published : Sep 10, 2022, 9:27 PM IST

Updated : Sep 10, 2022, 10:16 PM IST

मुंबई - गणपती बाप्पांची पंढरी असलेल्या लालबागमध्ये गणेशोत्सवादरम्यान भाविकांचा जनसागर उसळतो. तसेच अनंत चतुर्दशीदिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी परळ, लालबाग, गिरगाव या ठिकाणी देखील भाविकांची तुफान गर्दी होते. त्याच गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे आणि गुन्हेगार भाविकांच्या खिशावर डल्ला मारतात (disadvantage of crowd during immersion procession). काळाचौकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी 11 सोनसाखळी चोरीचे गुन्हे आणि 150 ते 160 पर्स (160 purses mobiles stolen from Lalbagh) मोबाईल तसेच कागदपत्रे गहाळ झाल्याच्या घटना दाखल आहेत.

काळाचौकी पोलीस ठाण्यात गणेश आगमन ते गणेश विसर्जन म्हणजेच दिनांक ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान मोबाईल चोरी तसेच सोनसाखळी चोरीचे एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ०४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच उघड गुन्ह्यामध्ये एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गणेश आगमन आणि विसर्जनाच्या दरम्यान या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी होते. या गर्दीमध्ये सुमारे १५० ते १६० पर्स, मोबाईल व इतर कागदपत्रे गहाळ झाली आहेत. पोलिस त्याचा तपास करीत आहेत, अशी माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंद मुळे यांनी दिली.

वि प मार्ग पोलीस ठाण्यात गणेश आगमन ते गणेश विसर्जन म्हणजेच दिनांक 31 ऑगस्ट ते दिनांक 9 सप्टेंबर दरम्यान मोबाईल चोरीचे 120 तसेच सोनसाखळी चोरीचा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 3 गुन्हे उघडकीस आले. या प्रकरणांमध्ये आत्तापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 6 मोबाईल जप्त करण्यात आले. ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.

Last Updated : Sep 10, 2022, 10:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.