ETV Bharat / city

Mumbai Fire : मुंबईच्या गगनचुंबी इमारतीत तब्बल 1568 आगीच्या दुर्घटना!

मुंबई आता आगीच्या घटनांचे शहर बनले आहे. कारण मागील दहा वर्षात मुंबईत तब्बल 48 हजार 434 आगीच्या घटना घडल्या असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे.

file photo
फाईल फोटो
author img

By

Published : Oct 22, 2021, 8:52 PM IST

मुंबई - करीरोड येथील गगनचुंबी वन अविघ्न इमारतीला आज(22 ऑक्टोबर) आग लागली. यानंतर पुन्हा एकदा मुंबईतील उंच इमारतींमध्ये लागणाऱ्या आगीच्या दुर्घटनांचा प्रश्न किती गंभीर आहे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मुंबईमध्ये एकामागून एक गगनचुंबी इमारत तयार होत असल्या तरी अग्नी सुरक्षेच्या बाबतीत या इमारती तयार होत असताना विचार केला जातो का? असा सवाल आता पुन्हा एकदा विचारला जात आहे.

mumbai fire
आरटीआयमधून आलेली माहिती

मुंबईतील आगींच्या घटनांमध्ये वाढ -

मुंबईत गगनचुंबी इमारतीचे जाळे पसरले आहे. मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. तसेच हे शहर सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. परंतु, मुंबई आता आगीच्या घटनांचे शहर बनले आहे. कारण मागील दहा वर्षात मुंबईत तब्बल 48 हजार 434 आगीच्या घटना घडल्या असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे 2008 पासून 2018 पर्यंत मुंबईत किती आगी लागल्या, तसेच किती गगनचुंबी इमारतात/ रहिवाशी इमारतीत / व्यावसायिक इमारतीत आणि झोपड्यात आग लागली? तसेच कोणत्या कारणामुळे आग लागली? आगीच्या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे? तसेच किती रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे? याबाबत माहिती विचारली होती.

mumbai fire
आरटीआयमधून आलेली माहिती

आरटीआयमार्फत मिळालेली माहिती -

सदर माहिती संदर्भात मुंबई अग्निशमन दलाचे जनमाहिती अधिकरी तथा विभागीय अग्निशमन अधिकारी एस. डी. सावंत यांनी शकील अहमद शेख यांना माहिती अधिकार अधिनियम-2005 अन्वये माहिती दिलेली आहे. माहितीप्रमाणे सन 2008 पासून जुलै 2018 पर्यंत एकूण 48 हजार 434 आग लागण्याच्या दुर्घटना झाल्या आहेत. त्यात 1 हजार 568 गगनचुंबी इमारतींमध्ये आग लागली आहे. तसेच 8 हजार 737 रहिवाशी इमारतीत आग लागली आहे. 3 हजार 833 व्यावसायिक इमारतीत आग लागली आहे. तर 3 हजार 151 झोपडपट्ट्यांमध्ये आग लागली आहे. सर्वात जास्त तब्बल 32 हजार 516 आग लागण्याचे कारण शोर्टसर्किट आहे. तब्बल 1 हजार 116 आग गॅस सिलिंडर लिकेजमुळे लागली आहे. तर 11 हजार 889 आग अन्य कारणांमुळे लागली आहे. या घटनांमध्ये एकूण 609 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 212 पुरुष, 212 स्त्री आणि 29 मुलांचा समावेश आहे. तसेच आगीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

mumbai fire
आरटीआयमधून आलेली माहिती

हेही वाचा - VIDEO : थरारक! आग लागलेल्या इमारतीहून खाली कोसळली एक व्यक्ती

परिमंडळ-I च्या हद्दीत एकूण 9 हजार 887 वेळा आग लागली असून, त्यात 325 गगनचुंबी इमारत, 1 हजार 546 रहिवाशी इमारत, 987 व्यावसायिक इमारत आणि 75 झोपड्यात घटनेच्या समावेश आहे. तसेच परिमंडळ-II च्या हद्दीत सर्वात जास्त एकूण 10 हजार 719 वेळा आग लागली असून, त्यात 129 गगनचुंबी इमारत, 1 हजार 824 रहिवाशी इमारत, 664 व्यावसायिक इमारत आणि 934 झोपड्यात घटनेचा समावेश आहे. तसेच परिमंडळ-III च्या हद्दीत एकूण 8 हजार 717 आग लागली असून, त्यात 496 गगनचुंबी इमारत, 1 हजार 382 रहिवाशी इमारत, 939 व्यावसायिक इमारत आणि 443 झोपड्यात घटनेचा समावेश आहे. तसेच परिमंडळ-IV च्या हद्दीत एकूण 8 हजार 328 वेळा आग लागली असून, त्यात 289 गगनचुंबी इमारत, 1 हजार 835 रहिवाशी इमारत, 661 व्यावसायिक इमारत आणि 403 झोपड्यात घटनेचा समावेश आहे.

mumbai fire
आरटीआयमधून आलेली माहिती

तसेच परिमंडळ-V च्या हद्दीत एकूण 5 हजार 683 वेळा आग लागली असून, त्यात 50 गगनचुंबी इमारत, 1 हजार 547 रहिवाशी इमारत, 208 व्यावसायिक इमारत आणि 1273 झोपड्यात घटनेचा समावेश आहे. तसेच परिमंडळ-VI च्या हद्दीत एकूण 5 हजार 107 आग लागली असून, त्यात 279 गगनचुंबी इमारत, 603 रहिवाशी इमारत, 374 व्यावसायिक इमारत आणि 23 झोपड्यात घटनेचा समावेश आहे.

सर्वात जास्त गगनचुंबी इमारतीत परिमंडळ-III च्या हद्दीत, एकूण 496 आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच सर्वात जास्त रहिवाशी इमारतीत परिमंडळ-IV च्या हद्दीत 1835 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच सर्वात जास्त व्यावसायिक इमारतीत परिमंडळ-I च्या हद्दीत 987 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच सर्वात जास्त झोपड्यात परिमंडळ-V च्या हद्दीत 1273 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच सर्वात जास्त एकूण 177 लोकांचा बळी परिमंडळ-I च्या हद्दीत झाला आहे. तसेच सर्वात जास्त आगीच्या घटनेत नुकसान एकूण 394809686 इतके रुपयांचे झाले आहे. तसेच वर्ष 2020 मध्ये एकूण 3 हजार 841 आगीच्या अपघातात 100 जणांचा मृत्यू व 298 जखमी झाले आहेत.

हेही वाचा - VIDEO : 60 मजली इमारतीतील 19 व्या माळ्याला भीषण आग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.