ETV Bharat / city

लॉकडाऊन काळात मुंबईत 14813 आरोपींवर गुन्हे दाखल

लॉकडाऊनच्या काळात 20 मार्च ते 4 जून या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचार बंदीचे उल्लंघन करण्याच्या 7228 प्रकरणात तब्बल 14813 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Maharashtra Police
कोरोना काळात कर्तव्य बजावताना महाराष्ट्र पोलीस
author img

By

Published : Jun 5, 2020, 3:55 PM IST

मुंबई- शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात लॉकडाऊनचा 5 वा टप्पा सुरू झाला असून 30 जूनपर्यंत वाढवला गेला आहे. यामुळेच पोलिसांकडून शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 1274 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात 20 मार्च ते 4 जून या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन करण्याच्या 7228 प्रकरणात तब्बल 14813 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या 1935 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 3868 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे, तर 9010 आरोपींना जामिनावर सोडण्यात आलेले आहे.

लॉकडॉऊन काळामध्ये कलम 188 नुसार मुंबईतील दक्षिण मुंबईत 911 गुन्हे दाखल करण्यात आले असून, मध्य मुंबईत 1991 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पूर्व मुंबईतही तब्बल 1218 गुन्हे दाखल झाले आहेत, तर पश्चिम मुंबईत 1831, उत्तर मुंबईत 1277 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे कोरोनाबाधित रुग्णांच्या संदर्भात, विनापरवानगी दुकान किंवा हॉटेल उघडी ठेवण्यासंदर्भात, पानटपरी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूक प्रकरणी नोंदवण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.