मुंबई - राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे 140 रुग्ण आढळून आले ( Maharashtra Corona Update ) असून, एकाचा आज मृत्यू झाला ( Covid Deaths Maharashtra ) आहे. तर 926 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ( New Corona Cases In Maharashtra ) दिली. राज्यात कोरोनाची लाट ओसरत चालली असल्याने आरोग्य विभागाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
तिसरी लाट ओसरली : कोरोनाच्या तिसरी लाट ओसरली असून, रुग्ण संख्या ही कमी झाली आहे. आज दिवसभरात 140 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 106 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत बरे होणाऱ्यांचे प्रमाण 98.11 टक्के इतके असून, आजपर्यंत 77 लाख 24 हजार 803 जण ठणठणीत झाले आहेत. तर कोविडचे निदान करण्यासाठी आजपर्यंत 7 कोटी 92 लाख 49 हजार 720 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 9. 94 टक्के म्हणजेच 78 लाख 73 हजार 509 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
मुंबई महापालिका - 43
ठाणे - 0
ठाणे मनपा - 1
नवी मुंबई पालिका - 2
कल्याण डोबिवली पालिका - 0
मीरा भाईंदर - 0
वसई विरार पालिका - 0
नाशिक - 2
नाशिक पालिका - 1
अहमदनगर - 12
अहमदनगर पालिका - 3
पुणे - 8
पुणे पालिका - 20
पिंपरी चिंचवड पालिका - 14
सातारा - 0
नागपूर मनपा - 1