ETV Bharat / city

होळीसाठी मध्य रेल्वेच्या १४ विशेष ट्रेन; एलटीटी - पटना, वाराणसी, पुणे- करमळी दरम्यान धावणार

author img

By

Published : Mar 9, 2022, 7:51 PM IST

होळी सणाच्या रंगाची मज्जा लुटण्यासाठी बाहेरगावी जाणाऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे १४ स्पेशल गाड्या चालविण्यात येणार आहेत. एलटीटी ते मऊ, वाराणसी, पुणे ते करमळी, पनवेल - करमळी अणि मुंबई - दाणापूर दरम्यान या गाड्या धावणार आहेत. १० मार्चपासून होळी विशेष रेल्वे गाड्यांची बुकिंग सुरू होणार आहे.

special trains
रेल्वे

मुंबई - होळी सणाच्या रंगाची मज्जा लुटण्यासाठी बाहेरगावी जाणाऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे १४ स्पेशल गाड्या चालविण्यात येणार आहेत. एलटीटी ते मऊ, वाराणसी, पुणे ते करमळी, पनवेल - करमळी अणि मुंबई - दाणापूर दरम्यान या गाड्या धावणार आहेत. १० मार्चपासून होळी विशेष रेल्वे गाड्यांची बुकिंग सुरू होणार आहे. होळी सणानिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने होळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - भाजपा आमदार प्रसाद लाड यांना मुंबई उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

मुंबई ते मऊ दरम्यान दोन फेऱ्या -

ट्रेन क्रमांक 01009 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनसवरून १५ मार्च २०२२ रोजी दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि मऊ येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी पोहचेल. ट्रेन क्रमांक 01010 विशेष गाडी १७ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी मऊ येथून सुटेल आणि तिसर्‍या दिवशी मध्य रात्री ३ वाजून ३५ मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल. तर कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बिना, ललितपूर, टिकमगड, खरगापूर, छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकुटधाम कारवी, माणिकपूर, प्रयागराज, ज्ञानपूर रोड, वाराणसी आणि औंरीहर या स्थानकांवर थांबे असणार आहे.

पुणे - करमळी दरम्यान चार फेऱ्या -

ट्रेन क्र. 01011 विशेष ११ मार्च २०२२ आणि १८ मार्च २०२२ रोजी पुणे येथून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता करमाळीला पोहचेल. ट्रेन क्र. 01012 विशेष गाडी १३ मार्च २०२२ आणि २० मार्च २०२२ रोजी करमाळी येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी पुण्याला पोहचेल. या दोन्ही गाड्यांचे लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या स्थानकांवर थांबे असणार आहे.

पनवेल - करमळी चार फेऱ्या -

ट्रेन क्र. 01013 विशेष १२ मार्च २०२२ आणि १९ मार्च २०२२ रोजी पनवेल येथून रात्री १० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता करमळीला पोहचेल. ट्रेन क्र. 01014 विशेष १२ मार्च २०२२ आणि १९ मार्च २०२२ रोजी करमळी येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी पनवेल येथे रात्री ८ वाजता पोहचेल. या दोन्ही गाड्यांना रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि स्थानकांवर थांबे असणार आहे.

मुंबई - दानापूर चार फेऱ्या -

ट्रेन क्र. 01015 विशेष १५ मार्च २०२२ आणि २२ मार्च २०२२ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी १०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दानापूर येथे सायंकाळी ५.१५ वाजता पोहचेल. ट्रेन क्र. 01016 विशेष १६ मार्च २०१२ आणि २३ मार्च २०२२ रोजी दानापूर येथून रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि तिसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे मध्य रात्री ३ वाजून ३५ मिनिटांनी पोहचेल. या दोन्ही गाड्यांना कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या सथानकांवर थांबे असणार आहेत.

हेही वाचा - Walse Patil On Fadnavis Allegation : फडणवीसांच्या आरोपांचं 'उद्या दूध का दूध, पाणी का पाणी' करणार : गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.