ETV Bharat / city

Todays Top News in Marathi : आज गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश विधानसभेसाठी मतदान; वाचा टॉप न्यूज - आज घडणाऱ्या घडामोडी

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

todays top news
todays top news
author img

By

Published : Feb 14, 2022, 6:05 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • आज गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, विधानसभेसाठी मतदान

आज गोवा, उत्तराखंड विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. तर उत्तर प्रदेश विधासभेसाठी दुसऱ्या टप्प्यातले मतदान आज पार पडेल. या मतदान प्रक्रियेसाठी निवडणुक आयोगाने पूर्ण तयारी केली आहे. तसेच मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

  • आज लॉंच होणार PSLV-C52

आज श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून सकाळी 6 वाजता PSLV-C52 लॉंच होणार आहे. या PSLV-C52 चे वजन 1710 किलो आहे.

  • प्रियंका गांधी आज हमीरपूर आणि जालौनमध्ये घेणार सभा

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आज हमीरपूर आणि जालौन येथे सभा घेणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जालंधर येथे सभा घेतील. सुरक्षेत झालेल्या चुकीनंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पंजाबमध्ये जाणार आहेत.

  • आज हिजाब प्रकरणाची सुनावणी

देशभरात वादाचा मुद्दा ठरलेल्या हिजाब प्रकरणीची आज कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहेत. न्यायालय या प्रकरणी काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

  • आज मुंबई काँग्रेसतर्फे नरेंद्र मोदींविरोधात आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासंदर्भ संसदेत केलेल्या वक्तव्याविरोधात आज मुंबई काँग्रेसतर्फे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील मलबार येथील सागर बंगला येथे 'नरेंद्र मोदी माफी मांगो आंदोलन' केले जाणार आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता हे आंदोलन करण्यात येईल.

  • पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण

पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण आज सकाळी 10:30 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठीमंत्री छगन भुजबळ तसेच मंत्री उदय सांमतही उपस्थित राहणार आहे.

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

कालच्या महत्वाच्या बातम्या -

पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीच्या ( Goa Assembly Elections 2022 ) मतदानाला काही तास शिल्लक राहिले आहे. प्रत्येक पक्षाने गोव्याकडे लक्ष केंद्रीत केल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. सध्या प्रचारतोफा थंडावल्या असून सोशल मिडियाच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाचे नेते कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करतील, जाणून घेऊया.

पणजी - गोवेकारासाठी गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन मतदान केंद्रावर घडविण्यासाठी निवडणूक आयोगाने चक्क ग्रीन पोलिंग स्टेशनची निर्मिती केली आहे. सोबतच खास महिलांसाठी पिंक पोलिंग स्टेशन उभारण्यात आला आहे. महिलांसाठी खास 105 पिंक पोलिंग स्टेशनची निर्मिती आयोगाने केली आहे.

कोटकपूरा (पंजाब) - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी व प्रियांका गांधी वाड्रा यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू असल्याची टीका केली होती. यावर प्रियांका गांधी ( Senior Congress leader Priyanka Gandhi Vadra ) यांनी उत्तर देत म्हणाल्या, आम्ही दोघे भाऊ बहिण एकमेकांसाठी जीव देऊ शकतो. त्या पंजाब येथील आगामी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत ( Punjab Assembly Election 2022 ) बोलत होत्या.

कोल्हापूर - महाविकास आघाडी स्थापन करताना ( Mahavikas Aghadi Government ) आम्ही देखील अनेक उंभरटे झिजवले आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर आमच्यासारख्या छोट्या पक्षांना डावललं जात असल्याची खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetty On MVA Government ) यांनी आज व्यक्त केली आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांनी शरद पवार यांना पत्र लिहीत महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून होत असलेल्या अनेक कामांविषयी नाराजी आणि छोट्या मित्रपक्षांना डावलत असल्याची खंत व्यक्त करून दाखवली होती. शेतकरी व सर्वसामान्यांच्या विश्वासाला तडा जाईल, असे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. यात वेळीच बदल केले नाहीत, तर सत्तेचा डोलारा कोसळण्यास वेळ लागणार नाही, असे देखील पत्रात लिहिले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.