ETV Bharat / city

Dispensary in Mumbai : मुंबईकरांच्या घराजवळ विविध सुविधायुक्त १३ दवाखाने, उपचार आणि तपासणी करणे होणार सोपे - Mumbai Health Department News

मुंबईसह देशभरातील रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असतात. या रुग्णालयांवरील ताण कमी व्हावा तसेच मुंबईकरांना घराजवळच चाचणी व उपचार मिळावे. यासाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र सुरु करण्याचे २०२२ - २३ च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित होते. आता या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून १३ दवाखान्यांमध्ये आवश्यक चाचण्यांसाठी यंत्रसामग्री व तज्ज्ञ डॉक्टर- आरोग्य कर्मचार्‍यांची व्यवस्था करण्याबाबतची कामे सुरु आहेत. ( 13 dispensaries with various facilities in Mumbai )

Mumbai Municipal corporation News
मुंबई महापालिका न्यूज
author img

By

Published : May 21, 2022, 7:51 PM IST

मुंबई - बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजनेंतर्गत पालिकेने पहिल्या टप्प्यात १३ दवाखाने सुरु करण्यासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार ( 13 dispensaries with various facilities in Mumbai ) आहेत. हे दवाखाने जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु केले जाणार आहेत. मलेरिया, डेंग्यू अशा आजारांसह आता स्किन, डोळे, नाक, कान, घसा आदींवर उपचार व चाचण्यांची सुविधा या दवाखान्यात उपलब्ध होणार आहे. या दवाखान्यांमुळे नागरिकांना त्यांच्या घराजवळ उपचार आणि चाचण्या करता येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी दिली.

रुग्णालयांवरचा ताण कमी होणार - रुग्णांना घराजवळच चाचणी करता यावी यासाठी बाळासाहेब ठाकरे योजने अंतर्गत पालिकेच्या दवाखान्यात चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेची नायर, केईएम व सायन ही तीन प्रमुख रुग्णालये आहेत. मुंबईसह देशभरातील रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असतात. या रुग्णालयांवरील ताण कमी व्हावा तसेच मुंबईकरांना घराजवळच चाचणी व उपचार मिळावे. यासाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र सुरु करण्याचे २०२२ - २३ च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित होते. आता या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून १३ दवाखान्यांमध्ये आवश्यक चाचण्यांसाठी यंत्रसामग्री व तज्ज्ञ डॉक्टर- आरोग्य कर्मचार्‍यांची व्यवस्था करण्याबाबतची कामे सुरु आहेत. नव्या आरोग्य केंद्रांवर रक्त किंवा त्या-त्या आजाराच्या चाचणीसाठी आवश्यक नमुने घेतले जाणार आहेत. या दवाखान्यांमुळे पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

येथे स्थापन होणार दवाखाने - १) कुलाबा दवाखाना, २) कुंभार वाडा दवाखाना - धारावी, ३) गुरुनानक आंबेडकर दवाखाना - खार पश्चिम, ४) बनाना लीफ दवाखाना - अंधेरी पश्चिम, ५) जुहू जालन दवाखाना - म्हाडा कॉलनी जुहू, ६) राठोडी दवाखाना - मालाड पश्चिम, ७) शैलजा विजय गिरकर दवाखाना - कांदिवली पश्चिम, ८) कांजू पाडा दवाखाना, गणेश मैदान - कुर्ला पश्चिम, ९) आनंद नगर दवाखाना - दहिसर पश्चिम, १०) अणिक नगर दवाखाना - वाशी नाका चेंबूर, ११) साईनाथ दवाखाना - घाटकोपर पश्चिम, १२) टागोर नगर दवाखाना - पवई आयआयटी व १३) दिनदयाळ उपाध्य मार्ग दवाखाना - मुलुंड पश्चिम

हेही वाचा - लाल महाल लावणी प्रकरण : नृत्यंगणेवर गुन्हा दाखल, मराठा महासंघाने केले शुद्धीकरण, शिवसेनेचे आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.