ETV Bharat / city

Central Railway : आठ महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून १२३ कोटीची वसूली

मध्य रेल्वेवर (Central Railway) गेल्या आठ महिन्यात विना तिकिट प्रवाशांकडून १२३ काेटी ३१ लाखांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय प्रवासादरम्यान काेराेना प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्या २४ हजार ९४४ प्रवाशांना पकडून ४१ लाख २८ हजारांचा दंड आकारला आहे.

central railway
central railway
author img

By

Published : Dec 3, 2021, 10:58 PM IST

मुंबई - अत्यावश्यक सेवेकरी आणि त्यांनतर काेराेनाच्या दाेन लसमात्रा घेतलेल्या प्रवाशांनाच उपनगरीय लाेकलने प्रवास करण्याची मुभा असल्याने विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या माेठी आहे. मध्य रेल्वेवर (Central Railway ) गेल्या आठ महिन्यात विना तिकिट प्रवाशांकडून १२३ काेटी ३१ लाखांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय प्रवासादरम्यान काेराेना प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्या २४ हजार ९४४ प्रवाशांना पकडून ४१ लाख २८ हजारांचा दंड आकारला आहे.

२४ हजार ९४४ फुकट्या प्रवाशांवर कारवाई -

काेराेना संक्रमणामुळे लाेकल प्रवासाची परवानगी नसल्याने नाईलाजास्तव सामान्य नागरिक विनातिकीट प्रवास करायचे. तर काहीजण अत्यावश्यक सेवेकऱ्यांचे बनावट ओळखपत्र बाळगून प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आल्याने रेल्वेने तिकीट तपासनीसांकडून विनातिकीट प्रवासी म्हणून कारवाई करण्यास सुरुवात केली. एप्रिल ते नाेव्हेंबर दरम्यान २० लाख ६८ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली. या विनातिकिट प्रवाशांकडून १२३ काेटी ३१ लाखांचा दंड आकारल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. प्रवाशांनी काेराेना नियमांचे पालन करावे तसेच वैध तिकिटावर प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी केले आहे.

मध्य रेल्वे पहिल्या क्रमांकावर -

उत्पन्न वाढविण्यासाठी मध्य रेल्वेने नॉन-फेअर रेव्हेन्यू अंतर्गत विविध उपक्रम राबविले आहे. सीएसएमटी आणि एलटीटी स्थानकात डिजिटल क्लोक रूम, ॲप आधारित व्हील चेअर सुविधा, डब्यांच्या आत जाहिराती, लोकल ट्रेन, होर्डिंग साइट सारखे उपक्रम राबविले आहे. यामधून एप्रिल ते नाेव्हेंबर दरम्यान मध्य रेल्वेला १४ काेटी ५७ लाखांचा महसूल मिळाला आहे.

वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन -

उपनगरी गाड्यांमध्ये आणि बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोहीमे दरम्यान ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग, बदललेल्या तिकिटावर प्रवास करणे, सिस्टमद्वारे व्युत्पन्न तिकिटांचे ई-तिकिटांमध्ये रूपांतर करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकिटांचे हस्तांतरण करण्याची प्रकरणे अशा अनियमितता प्रामुख्याने लक्षात आल्या. गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वे करीत आहे.

हेही वाचा - Maharashtra Corona Update : शुक्रवारी राज्यात 664 नवे कोरोना रुग्ण; तर 915 रुग्णांना डिस्चार्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.