ETV Bharat / city

गेल्या 24 तासांत मुंबई पोलीस दलातील 120 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह - मुंबई पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

डॉक्टर्स तसेच, पोलीस दलातील अधिकारी यांना देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. 24 तासांमध्ये 120 पोलीस कर्मचाऱ्यांना ( 120 Mumbai police found corona positive ) कोरोनाची लागण झाली आहे. तर, एका पोलास कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Mumbai police found corona positive
मुंबई पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
author img

By

Published : Jan 11, 2022, 3:22 PM IST

Updated : Jan 11, 2022, 4:55 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोना, ओमायक्रॉनचा संसर्ग झपाट्याने पसरू लागला असून अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात याचा संसर्ग होताना पाहायला मिळत आहे. डॉक्टर्स तसेच, पोलीस दलातील अधिकारी यांना देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. 24 तासांमध्ये 120 पोलीस कर्मचाऱ्यांना ( 120 Mumbai police found corona positive ) कोरोनाची लागण झाली आहे. तर, एका पोलास कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

कोविड चाचणी करताना पोलीस

हेही वाचा - Mumbai-Ahmedabad Tejas Express : मुंबई-अहमदाबाद 'तेजस' एक्सप्रेस धावणार फक्त तीन दिवस; रेल्वे मंत्रालयाचा निर्यण

पोलीस अंमलदारांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कोरोनाची लागण होऊ लागली आहे. सद्यस्थितीत 13 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लागण झाली आहे. तर, 643 अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील कोविड झाला आहे. मात्र, सर्वांची प्रकृती ठीक असून बरे होण्याचे प्रमाणदेखील चांगले आहे. 101 पोलीस हॉस्पिटलमध्ये दाखल असून हा आकडा खाली घसरला आहे. तर, 450 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. 57 जणांना दुसऱ्या डोसनंतर कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाली असली तरी, अधिकारी, अंमलदारांची प्रकृत्ती ठीक असून चिंतेची बाब नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दुर्दैवाने तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबई पोलीस दलातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. गृह विभागाकडून पोलीस दलातील अधिकाऱ्यांकरिता व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश गृह विभागाकडून देण्यात आले आहे. तर, अनेक आजाराने ग्रस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये, असे आदेश देखील देण्यात आले आहे. तरी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी हे पॉझिटिव्ह होत असल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण १ हजार ३१७ पोलीस कोविड पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण १ हजार ३१७ पोलीस कोविड पॉझिटिव्ह ( corona positive ) झाले आहेत. त्यात मुंबईतील पोलिसांचाही समावेश आहे. आतापर्यंत १८ वरिष्ठ आयपीएस अधिकारीही कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. के पूर्वचे प्रभाग अधिकारी सपकाळे, डीएमसी सुभाष दळवी यांच्यासह बीएमसी, डीएमसी आणि एमएमसीचे १ डझनहून अधिक वॉर्ड अधिकारी देखील पाझिटिव्ह झाले आहेत.

पोलिसांमध्ये १३ पोलीस उपायुक्त म्हणजे डीसीपी, ४ अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि एका पोलीस सहआयुक्ताचा समावेश आहे. कोविडमुळे गेल्या ४ दिवसांत मुंबईच्या २ पोलीस कर्मचाऱ्याचे निधन झाले आहे. फ्रंट लाइन आणि आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना देखील कोरोनाचा संसर्ग सातत्याने होत आहे. मुंबईतील बीएमसी आणि खासगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि वॉर्ड बॉय देखील कोविड पॉझिटिव्ह असल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा - Reactions of Celebrity : लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण; मान्यवरांच्या प्रतिक्रिया

Last Updated : Jan 11, 2022, 4:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.