ETV Bharat / city

मुंबईत आतापर्यंत १२ हजार ९० बालकांना कोरोना, २६ बालकांचा मृत्यू

मुंबईत गेल्या वर्षभरात ९ वर्षाखालील तब्बल १२ हजार ९० बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच २६ बालकांचा मृत्यू झाला आहे.

childrens tested covid
childrens tested covid
author img

By

Published : May 28, 2021, 4:33 PM IST

मुंबई - मुंबईत गेल्या वर्षभरात ९ वर्षाखालील तब्बल १२ हजार ९० बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच २६ बालकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधील कोरोनाची आकडेवारी पाहिल्यास बालकांची संख्या कमी आहे. तिसऱ्या लाटेदरम्यान लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याने पालिकेने त्यासाठी तयारी सुरु केली आहे. सध्या असलेल्या कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी राखीव बेड्स असणार आहेत. तसेच वरळी येथे लहान मुलांसाठी कोविड सेंटर उभारले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा - सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला एनसीबीकडून अटक

१२ हजार ९० बालकांना कोरोना -

मुंबईमध्ये मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. आतापर्यंत मुंबईमध्ये कोरोनाचे ७ लाख १ हजार २६६ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १४ हजार ७४२ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६ लाख ५६ हजार ४४६ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत ० त ९ वयोगटातील १२ हजार ९० बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २६ बालकांचा मृत्यू झाला आहे. तसेच १० ते १९ वयोगटातील ३१ हजार ५० मुलांना कोरोनाची लागण झाली असून ४५ मुलांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये सध्या २८ हजार ३१० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी ३५१ दिवस इतका आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज २८ हजार ४८० तर आतापर्यंत एकूण ६१ लाख ७३ हजार ६ चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

लहान मुलांसाठी कोविड सेंटर -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरु होताच रुग्णालयातील खाटा कमी पडू लागल्याने पालिकेने पाच ठिकाणी जंबो कोविड सेंटर उभारले. यामुळे रुग्णांवर उपचार करताना अडचणी आल्या नाहीत. मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेत १८ वर्षाखालील लहान मुलानाही कोरोनाची लागण झाली आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोची लागण होण्याची शक्यता टास्क फोर्सने वर्तवली आहे. यामुळे मुंबईत वरळी येथे पालिकेच्या माध्यमातून ५०० खाटांचे लहान मुलांसाठी जम्बो कोविड केंद्र उभारण्यात येणार आहे. एक वर्ष ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना येथे दाखल केले जाणार असून लहान मुलांबरोबर आई असणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन क्युबिकल पद्धतीने या जम्बो केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. या कोविड सेंटरमध्ये ७० टक्के ऑक्सिजन खाटा असतील तर २०० आयसीयू खाटा असणार आहेत. हे लहान मुलांचे जम्बो कोविड केंद्र ३१ मे पूर्वी उभारण्याचा पालिकेचा मानस आहे असे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोविड सेंटरमध्ये २० हजार खाटा -

मुंबईत तीन ठिकाणी प्रत्येकी दोन हजार खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याचे काम सुरु झाले आहे. यातील एक मालाड येथे तर सायनच्या सोमय्या मेडिकल सेंटर आणि कांजुरमार्गच्या क्रॉम्प्टन कंपनीत नवीन जम्बो रुग्णालये उभी करण्यात येतील. आताची चारही जम्बो कोविड सेंटर उभारताना आवश्यकतेनुसार विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आहे. या सर्व केंद्रात गरजेनुसार प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे सहा हजार अधिक खाटा उभारता येणार आहेत. जूनच्या मध्यावधी पर्यंत साडेसहा हजार अतिरिक्त खाटांची जम्बो कोविड सेंटर उभी राहतील. येत्या काळात एकूण ११ जम्बो कोविड सेंटर असतील. यात एकूण सुमारे २० हजार खाटा असणार आहेत व ती १०० टक्के ऑक्सिजनवर आत्मनिर्भर असलेली असतील असे आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा -'चंद्रकांत पाटलांना वेगवेगळी स्वप्न पडण्याचा छंद, त्यावर मी काय बोलणार?'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.