ETV Bharat / city

House Slab Collapsed Chembur : घराचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, तर 10 जण जखमी - चेंबूर स्लॅब कोसळला

पुष्पक कंपाऊंड, गणेश नगर, नवजीवन सोसायटी, चेंबूर येथील तळ अधिक एक मजला असलेल्या घराचा स्लॅब ( house slab collapsed Chembur ) दुपारी ३.१५ च्या सुमारास कोसळला. स्लॅब कोसळल्याने ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दल येण्याआधीच ६ जणांना इनलॅक्स रुग्णालयात दाखल केले. काही वेळात मुंबई अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले.

Slab Collapsed Chembur
Slab Collapsed Chembur
author img

By

Published : Jun 23, 2022, 7:22 PM IST

Updated : Jun 23, 2022, 10:36 PM IST

मुंबई - चेंबूर आणि साकीनाका येथे दरड कोसळण्याच्या तर घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथे कंपाऊंडची भिंत कोसळली. या घटना ताज्या असतानाच चेंबूर येथे घराचा स्लॅब कोसळला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. पुष्पक कंपाऊंड, गणेश नगर, नवजीवन सोसायटी, चेंबूर येथील तळ अधिक एक मजला असलेल्या घराचा स्लॅब ( house slab collapsed Chembur ) दुपारी ३.१५ च्या सुमारास कोसळला. स्लॅब कोसळल्याने ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दल येण्याआधीच ६ जणांना इनलॅक्स रुग्णालयात दाखल केले. काही वेळात मुंबई अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. अग्निशमन दलाने आणखी ६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत एकूण 10 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. तर जखमींपैकी एक जण गंभीर असल्याची माहिती स्थानिक माजी नगरसेवक महादेव शिगवण यांनी दिली.

यापूर्वी घडलेल्या घटना :

भिंत कोसळून लहान मुलीचा मृत्यू : घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथे वन विभागाच्या जागेवर जय अंबे नगर झोपडपट्टी आहे. येथील एका घरावर मंगळवारी २१ जूनला दुपारी पाउणे दोन वाजण्याच्या सुमारास कंपाऊंडची भिंत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढले. या तिघांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिघा जखमींपैकी नायरा धोत्रे या 3 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

दरड कोसळून दोघे गंभीर : चेंबूर येथील भीम नगर, आरसीएफ वाशी नाका येथे १९ जूनला सकाळी दरड कोसळली. डोंगरावर असलेल्या घरावर दरड कोसळली. या दुर्घटनेत दोघे जखमी झाले. अरविंद प्रजापती (वय 25 वर्षे), आशिष प्रजापती (वय 20 वर्षे), अशी जखमींची नावे असून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुर्ला काजुपाडा येथील संगम सोसायटीमध्ये १६ जून रोजी एका घरावर दरड कोसळली. यात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेऊन दोन जणांना सुखरूप बाहेर काढले आहे.

हेही वाचा - सरकार स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि भाजपकडे काय आहेत पर्याय, राज्यपालांची भूमिका महत्वाची

Last Updated : Jun 23, 2022, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.